नीलिमा मृत्यूपूर्वी काही दिवस प्रचंड तणावाखाली होती; परंतु कोणत्या कारणाचा तिने धसका घेतला होता, हे पुढे आले नव्हते.
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी (Neelima Chavan Death Case) घातपात झाल्याबाबतचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे पोलिस यंत्रणेने स्पष्ट केले आहे; परंतु हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर आहे. नीलिमा काही दिवसांपासून प्रचंड तणावाखाली होती.
त्याबाबतचे काही पुरावे हाती लागले आहेत. तो तणाव नेमका कोणत्या कारणाने होता, कामासंदर्भातील होता की अन्य काही, याबाबत चौकशी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाने पोलिसांसमोर (Ratnagiri Police) आव्हान उभे केले आहे.
सुरुवातीपासूनच हा घातपात असल्याची चर्चा होती. त्याअनुषंगाने तपास केला. प्रथमदर्शी निष्पन्न झालेल्या बाबी म्हणजे तिचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार तिच्या शरीरावर कुठल्याही मृत्यूपूर्वी जखमा तसेच अंतर्गत जखमा दिसून आलेल्या नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्हिसेरा तपासणीसाठी राखून ठेवला आहे.
लवकरच त्याचा अहवाल प्राप्त होणार असून, मृत्यू कशाने झाला हे निष्पन्न होईल; परंतु घातपात झाल्याचा कोणताही पुरावा आतापर्यंत हाती लागला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नीलिमा मूळची चिपळूण तालुक्यातील ओमळी गावची राहणारी आहे. ती मैत्रिणींसोबत दापोलीत खोली घेऊन राहत होती.
नीलिमाचे येण्या-जाण्याचे मार्ग कोणते होते, याची माहिती घेऊन ते सर्व मार्ग पोलिसांनी तपासले. त्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजदेखील तपासले; परंतु काहीच हाती लागलले नाही. तिच्या डोकीवरचे केस काढल्याचे आरोप करण्यात आले. त्यावरून अनेक तर्कवितर्क लढविले.
यासंदर्भात केईएम हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक विभागाची मदत घेण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्यात पडून ७२ तास झाल्याने मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली की डोकीवरचे केस जाऊ शकतात. एका संशयितालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडूनही काही निष्पन्न झाले नाही.
सर्व शक्यता तपासून पाहिल्यानंतर नवीन माहिती पोलिसांना मिळाली आहे. नीलिमाच्या नातेवाइकांनी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्याचे समजते. नीलिमा मृत्यूपूर्वी काही दिवस प्रचंड तणावाखाली होती; परंतु कोणत्या कारणाचा तिने धसका घेतला होता, हे पुढे आले नव्हते; परंतु आता पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. त्यामध्ये तिने ज्याच्याशी संवाद साधला त्याला या तणावाबाबत माहिती दिल्याचे समजते. त्यामुळे हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर गेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.