Minister Ravindra Chavan Ratnagiri-Sindhudurg LokSabha Constituency esakal
कोकण

रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार गुलदस्त्यात; मंत्री चव्हाणांनी पत्ते ठेवले राखून; राज्यात 48 पैकी 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य

एनडीएचे खासदार ४०० पार करायचे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

'जोपर्यंत उमेदवारी घोषित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाला आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा असते. यात गैर काही नाही.'

रत्नागिरी : महायुतीत (Mahayuti) कोणत्या पक्षाला उमेदवारी द्यायची हा निर्णय वरिष्ठांचा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये (Ratnagiri-Sindhudurg Loksabha Constituency) उजवी विचारसरणी विजयी होणार. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी एनडीए जिंकणार. उमेदवार कोण आहे यापेक्षा जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे, असे सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी या मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळणार, हा प्रश्न गुलदस्त्यात ठेवला.

रत्नागिरी दौऱ्यावर आले असता सायंकाळी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) पंतप्रधान व्हावेत, याकरिता सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. एनडीएतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी अजितदादा गट, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व घटकपक्ष उजव्या विचारसरणीचा उमेदवार विजयी करतील.

हिंदुत्व म्हणजे एनडीए. एनडीए ही विचाराने नव्हे, विकासाने जोडली गेली आहे. एनडीएचे खासदार ४०० पार करायचे आहेत, असे पंतप्रधानांनी सांगितले आहे. जोपर्यंत उमेदवारी घोषित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पक्षाला आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा असते. यात गैर काही नाही; परंतु कोणती जागा कोणी लढवावी, हे वरिष्ठांनी ठरवल्यानंतर महायुतीमधील सर्व पक्ष एकत्रितपणे उमेदवार विजयी करतील.

पालघर पोटनिवडणूक भाजप-सेना मैत्रीपूर्ण लढले. त्यात भाजपचे खासदार जिंकले; परंतु नंतरच्या निवडणुकीत युती झाली व ती जागा शिवसेनेला देऊन जिंकून आणले होते. त्यामुळे कार्यकर्त्यांना वरिष्ठांचा आदेश सर्वमान्य असतो. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्ते काम करणार आहेत, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरीसाठी १२३५ कोटी

राज्य सरकारतर्फे विविध विकासकामांसाठी १२३५ कोटी रुपये व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १९२१ कोटी रुपये मंजूर केले आहेत. यातील बहुतांश कामे सुरू झाली आहेत. बांधकाम खात्यातर्फे नव्याने १७१८ कोटी रुपयांच्या निविदा निघाल्याने पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामे होणार आहेत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक अन् दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु

SCROLL FOR NEXT