कोकण

रत्नागिरीमध्ये वणव्यात काजू, आंबा कलमे मातीमोल

वाटदमध्ये ५०० आंबा कलमे होरपळली; माभळेत १० एकरांतील कलमे जळाली

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : तालुक्यातील रत्नागिरी-गणपतीपुळे मार्गावरील(ratnagiri) वाटद खंडाळा येथील आंबाबागेला(mango farm) भीषण आग लागली. या आगीच्या तांडवामध्ये मोहोरलेली सुमारे ५०० कलमे होरपळली. सुक्या गवतामुळे आग झपाट्याने पसरली असून आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, माभळेत लागलेल्या वणव्यातही काजू, आंबा कलमे खाक झाली आहेत.जेएसडब्लू एनर्जीच्या फायरब्रिगेडने घटनास्थळी दाखल होऊन ही आग आटोक्यात आणली. वाटद-खंडाळा येथे शिक्षक कॉलनीसमोर असलेल्या आंबा बागेमध्ये ही घटना घडली. शुक्रवारी (ता. ३१ जानेवारी) दुपारी अचानक ही आग लागली. सुकलेल्या गवताला आग लागली आणि वाऱ्यामुळे काही क्षणात झपाट्याने आग पसरत तिने रौद्र रूप धारण केले. आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र ती आटोक्यात येत नव्हती. (in ratnagiri ganpatipule route some mango and cashew trees are totaly burnt)

आगीने काही तासांमध्ये बागेतील सुमारे ५०० कलमे होरपळून गेली. दरम्यान, जेएसडब्लू एनर्जीच्या फायरब्रिगेडला आग लागल्याचे समजताच गाडी घटनास्थळी दाखल झाली. फायरमन अक्षय पवार, अभिजित पाटील, सुहास चव्हाण, रोहित डोडमणी यांनी अथक प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली. प्रशासनाने झालेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी वाटद खंडाळा येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश रहाटे यांनी केली आहे.संगमेश्वरजवळच्या माभळे येथे लागलेल्या वणव्यामुळे दहा एकर क्षेत्रावरील आंबा काजू तसेच इतर झाडे जळून खाक झाली आहेत.

मोहोरलेल्या आंबा व काजू बागा वणव्यामुळे खाक झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. माभळे येथील फणसाचे भाटले ते गवळवाडीपर्यंतच्या भागात वणवा लागला. या क्षेत्रातील काजू, आंबा तसेच इतर झाडे जळून खाक झाली. शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने आग लावली. त्यामुळे आगीचा मोठा भडका उडून ती पूर्ण सड्यापर्यंत पसरली. वणवा लागला असल्याचे समजताच शेतकऱ्याने धाव घेऊन ती विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र वणवा क्षेत्र जास्त असल्याने दोन तास झाले तरी आग आटोक्यात येत नव्हती.शेतकऱ्यांनी सर्व बाजूने प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली; मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. दरवर्षी माभळे येथे आग लागते. यामुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly: आला, आला, आला...पाटील आला! सरकार कुणाचेही असो; रुबाब 'पाटलां'चाच! राज्यातून २४ 'पाटील' पोहोचले विधानसभेत

IND vs AUS 2nd Test: रोहित आला पण... टीम इंडियाचा युवा फलंदाज दुसऱ्या कसोटीला मुकणार, दुखापतीचे ग्रहण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची सपाट सुरुवात; मिडकॅप शेअर्समध्ये खरेदी, अदानी समूहाचे शेअर्स कोसळले

Karad Accident : मलकापुरात दुचाकीच्या धडकेत तरुण ठार; कुटुंबीयांच्या डोळ्यासमोरच अपघात

Bike Accident : भरधाव टेम्पोच्या धडकेत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष जागीच ठार; डोक्याला गंभीर मार लागला अन्..

SCROLL FOR NEXT