indian flag hoisted in sea yesterday area of malvan sindhudurg 
कोकण

कोकणात ३२१ फूटचा तिरंगा ध्वज फडकतो लाटांवर

सकाळ वृत्तसेवा

मालवण : भारताच्या सैन्याने पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना १६ डिसेंबर १९७१ ला घडली. या विजय दिनाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधत लोणंद (जि. सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या ४१ सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने तारकर्ली-मालवण समुद्रात सुमारे ३२१ फूट तिरंगा ध्वज फडकवून भारतीय सैन्याच्या शौर्याला आगळावेगळा सलाम करत समुद्रामध्ये विजय दिवस साजरा केला.

समुद्रातील पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा ३२१ फूट लांब ध्वज फडकविण्याची ही पहिलीच वेळ आहे, असा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी भारतमाता की जय, वंदे मातरम्‌ जयघोषाने तारकर्ली-मालवणचा समुद्रकिनारा दणाणून गेला. अशाच पद्धतीने पीओके (पाक व्याप्त काश्‍मिर) बाबतीत देखील विजय मिळवून आनंद साजरा करण्याची संधी देण्याची भावना व्यक्त केली. भारतीय सैन्याने १६ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानमधील पूर्वी पाकिस्तान असलेल्या आताच्या बांग्लादेशाला स्वांतत्र्य मिळवून दिले होते. त्यावेळीपासून १६ डिसेंबरला दरवर्षी देशामध्ये विजय दिवस साजरा केला जातो.

याचे औचित्य साधत लोणंद (सातारा) येथील श्री भैरवनाथ डोंगर मॉर्निंग वॉक ग्रुपचे मार्गदर्शक सदस्य एव्हरेस्टवीर प्राजीत पररेशी यांच्या संकल्पनेतून डोंगर ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शेळके, हेमंत निंबाळकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र शेळके, शंभूराज भोसले, रोहित निंबाळकर, वरुण क्षीरसागर, रविंद्र धायगुडे, पंकज क्षीरसागर, तानाजी धायगुडे, अनिल क्षीरसागर, राजेंद्र काकडे आदीच्या सहकार्याने तारकर्ली - मालवण येथील समुद्रामध्ये ३२१ फुट तिरंगा ध्वज फडकवला.

यात अन्वय अंडरवॉटर सव्हिसेसचे रूपेश प्रभू, अन्वय प्रभू, सुमंत लोणे, राजू परब, रश्‍मीन रोगे, नारायण रोगे यांच्या सहकार्याने तीन बोटी व एक स्पीड बोटद्वारे सुमारे तीन किलोमीटर समुद्रामध्ये गेल्यानंतर तिरंगा फडकवण्यात आला. या उपक्रमासाठी ॲडव्हेंचर फोटोग्राफर मेहुल ढवळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT