Issue Of merge of Dodamarg In Goa News 
कोकण

गोव्यात विलीनीकरणामागे कशाचे आहे आकर्षण ? 

अवित बगळे

पणजी / दोडामार्ग - बेळगाव, बिदर, भालकी आणि कारवारसह महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी एकेकाळी घोषणा गाजत होती. त्यापैकी कारवार परिसरातील म्हणजे अकोला, यल्लापूर, शिर्सीपर्यंतच्या मुलुखातील जनतेला आता गोव्यात यायचे आहे. त्यातूनच त्यांनी आपला उत्तर कन्नड जिल्हा गोव्यात समाविष्ट करावा यासाठी गेल्या दशकभरात मोठी मोहीम चालवली होती. त्यांना गोव्यातील काही नेत्यांचाही अीाशर्वाद व सहानुभूती होती.

कारवार परिसरातील मोठ्या भूखंडांवर डोळा ठेऊन हे सारे सुरू होते. जसे कारवार परिसरातील युवक युवती रोजगारासाठी गोव्यात आले आहेत तसे सिंधुदुर्गातील. त्यात मूलभूत फरक एकच आहे तो म्हणजे कारवार परिसरातील युवक-युवती गोव्यात राहतात तर सिंधुदुर्गातील युवक-युवती दररोज ये जा करतात. याला वेर्णा परिसरात शेकडोंच्या संख्येने राहणाऱ्यांचा अपवाद आहे. 

गोव्यातील सुबत्तेचे मोठे आकर्षण

या साऱ्यांना आपापला प्रदेश गोव्यात विलीन व्हावा असे वाटणे साहजिक आहे. त्याला गोव्यातील सुबत्तेचे मोठे आकर्षण आहे. गोव्यात गृहिणींना मासिक दीड हजार रुपये देणारी गृह आधार योजना आहे. खासगी इस्पितळातही पैसे न देता उपचार घेता येणारी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना आहे, ज्येष्ठ नागरिकांना मासिक दोन हजार रुपये देणारी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आहे, अकरावीच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉपचे वितरण होते, युवक-युवतींना विनातारण 20 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते, मासे व भाजीपाला रास्त दरात देण्याची सरकारमान्य दुकाने आहेत, अशी कितीतरी उदाहरणे देता येतील ज्यातून कल्याणकारी राज्य अशी गोव्याची प्रतिमा निर्माण झाली आहे. 

जगभरातील फॅशनची गोव्यात चलती

या साऱ्या प्रवाहात आपण सहभागी व्हावे असे वाटण्यात काही गैर नाही; पण ते प्रत्यक्षात येईल का याचा विचार होणे आवश्‍यक आहे. जगभरातील फॅशनची आज गोव्यात चलती आहे. जगातील फॅशन जुनेगोवेच्या फेस्ताच्या वेळी अवतरते असे काही वर्षांपूर्वीपर्यंत मानले जायचे. बोट सुरु असतेवेळी मुंबईतून येणारे उतारू ही फॅशन आपल्यासोबत आणत; मात्र आता दूरचित्रवाणी वाहिन्यांवर अहोरात्र फॅशन शो बघण्याची सोय झाल्यापासून फॅशन कधी अवतरली आणि त्यात कसा बदल होत गेला हेच समजेनासे झाले आहे; मात्र 1910ते 1950 या कालावधीचा विचार केला तर महाराष्ट्र आणि मुंबई इलाक्‍याचा ठसा येथील पेहेरावावर मोठा होता. पागोटी, धोतर, अंगरखा, उपरणे आणि जोडा असा हिंदूंचा पेहराव असे. खिस्ती पुरुषांचा पेहराव पाश्‍चिमात्य धाटणीचा होता.

आजच्या घडीचे सत्य असे... 
महाराष्ट्राचा हा ठसा गोव्याने केव्हाच पुसला आहे. आता गोव्यात स्थायिक झालेल्या महाराष्ट्र, कर्नाटकातील लोकांची दुसरी पिढी गोव्यात रुळली आहे. गोव्यातील बहुतेक व्यवसाय आज परप्रांतीयांच्या हातात गेले आहेत. असलेला रोजगारही महाराष्ट्रातील व कर्नाटकातील भाग विलीन केला तर तेथील युवा वर्ग बळकावेल, अशी भीती साऱ्यांना आहे. सीमावर्ती भागात विलीनीकरणाविषयी थोडीशी सहानुभूती असली तरी तो आवाज फार क्षिण आहे. सिंधुदुर्गातील खनिजावर काहींचा डोळाही असेल; पण हे सारे होणे शक्‍य नाही. विलीनीकरणाचा ढोल कितीही बडवला गेला तरी त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही हेच आजच्या घडीचे सत्य आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT