jackfruit machine made by suhas khare ratnagiri 
कोकण

आता फणस कापणे झाले सोपे कसे वाचा.......

शिरीष दामले

रत्नागिरी :  चिपळूण येथील फॅब्रिकेशनचा व्यवसाय करणार्‍या तंत्रज्ञाने फणस कापण्याचे यंत्र (जॅकफ्रूट कटर) बनवले आहे. यामुळे फणस कापणे अत्यंत सुलभ होते. त्यासाठी लागणारा वेळ, श्रम दोन्ही कमी होतात. फणस फोडण्यासाठी कोयती, अगदी अपवादात्मक परिस्थितीत कुर्‍हाडीचा वापर होत असल्याने त्यावर पुरुषांची मक्तेदारी होती. ती या यंत्राने लंपेल. व्यावसायिक पद्धतीने फणसावर प्रक्रिया करणार्‍यांना याचा फायदा होईल.


चिपळुणातील हौशी व्यावसायिक अभय अंतरकर हे फणसाच्या तळलेले गरे बवनतात.  त्यासाठी फणस फोडण्यात वेळ जातो म्हणून त्यांनी सुहास खरे यांना फणस कापण्याचे यंत्र बनवण्यास सांगितले. खरेंनी ते मनावर घेतले. यामध्ये तांत्रिक भाग अगदी कमी आहे, सांगताना खरे म्हणाले, लाईटवेट गाड्यांचा कमानीचा पाटा घेतला. त्याला साधारणशी धार काढली. लोहाराकडून आणि नंतर ग्राइंडरवर हे काम करून घेतले.

असे बनवले मशिन

पाट्याला थोडा कर्व्ह दिला. नंतर पुन्हा हाताने धार काढली. याचे कारण त्यासाठी वापरायच्या पोलादाची झीज कमी होते,धार चांगली टिकते. नंतर लोखंडी फ्रेमवर नटबोल्टच्या साह्याने त्याला फिट केले आणि पाठीमागे पाइपचे हॅण्डल जोडले. तो कायमचा बसवता आला असता, परंतु फणसाच्या चिकाचा थर बसतो. तो नटबोल्ट काढून साफ करता येतो. कोयती, कुर्‍हाड यापेक्षा ताकद कमी लागते आणि नेमकेपणाने तुकडे होतात. फणसाचे स्लाइसही काढता येतात. याचा उत्पादन खर्चही कमी आहे. मुलेही हे यंत्र चालवू शकतात. 

कैरी कापण्यासाठीही यंत्र बनवणार

सुहास खरे म्हणाले की, बाटांच्या कैरीचे लोणचे हवे अशी मागणी असते. कारण त्याचं फोड नरम पडत नाही. आपल्याकडे बाटा वगळून लोणचे घालण्याची पद्धत आहे; मात्र या यंत्राचे तंत्र वापरून बाटांसह कैरी कापण्यासाठीही अगदी छोटे यंत्र बनवणार आहे.

चीनमधील फणसाच्या विविध उत्पादनांसाठी ऑटोमायझेशन असलेल्या पिलिंग मशीनचा व्हिडिओ पाहिला होता. ते आपल्याकडे कठीण मात्र फणस कापणे सोपे व्हावे म्हणून खरे यांना चालना दिली. मी ते वापरतोही आहे. दिवसभरात तीन मुली जेवढे काम करतील तेथे आता दोनच पुरतात. शिवाय पुरुषाची गरज लागत नाही.
अभय अंतरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT