सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ किलोमीटर मार्गापैकी साडेनऊ किलोमीटर करुळ घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
वैभववाडी : काँक्रिटीकरणाच्या कामासाठी करुळ घाटमार्ग (Karul Ghatmarg) सोमवार (ता. २२) पासून बंद ठेवण्यास सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांनी (Sindhudurg Collector) परवानगी दिली आहे. घाटमार्ग ३१ मार्चपर्यंत पूर्ण बंद राहणार आहे. या महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा आणि अणुस्करा घाटमार्गे (Anuskara Ghat) तर भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक सुरू असणार आहे.
तळेरे-कोल्हापूर (Kolhapur) महामार्गाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर या १८ किलोमीटरसाठी १७१ कोटी रुपये मंजूर झाले होते. दुसऱ्या टप्प्यात तळेरे-गगनबावडा मार्गावरील २१ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये मंजुरी मिळाली. यातील १६ किलोमीटरचा रस्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर पाच किलोमीटरचा रस्ता गगनबावडा तालुक्यात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १६ किलोमीटर मार्गापैकी साडेनऊ किलोमीटर करुळ घाटरस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. करुळ घाटातील पाच किलोमीटर रस्त्याचे दुपदरीकरण सुरू असताना वाहतूक करणे अशक्य असल्यामुळे महामार्ग प्राधिकरणने १५ जानेवारीपासून करुळ घाटरस्ता बंद ठेवण्यासाठी परवानगीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु पोलिस प्रशासनाचा अहवाल आणि इतर गोष्टीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी करुळ घाटरस्ता दोन जानेवारीपासून पूर्ण बंद ठेवण्यास परवानगी दिली आहे.
हा घाटमार्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यास मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत पाच किलोमीटरमधील मोरी बांधकाम करणे, संरक्षक भिंती बांधणे आणि रस्ता काँक्रिटीकरण करणे ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. घाटमार्ग एकूण ७० दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे करुळ घाटमार्गावरील अवजड वाहतूक फोंडाघाट आणि अणुस्करा घाटमार्गे वळविण्यात येणार आहे. भुईबावडा घाटमार्गे केवळ प्रवासी वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे.
तळेरे-फोंडाघाट-राधानगरी-ठिकपुर्ली-कळंबा-कोल्हापूर ः अंतर १२३ किलोमीटर
तळेरे-भुईबावडा-गगनबावडा-कळे-कोल्हापूर ः अंतर १०७ किलोमीटर (फक्त प्रवासी वाहतूक)
तळेरे-वैभववाडी-उंबर्डे-तळवडे-अनुस्करा-वाघव-केर्ले-कोल्हापूर ः अंतर १२८ किलोमीटर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.