Deepak Kesarkar esakal
कोकण

'...तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे'; 'कावळेसाद' वादानंतर मंत्री केसरकरांचं मोठं विधान

गेळे गावाच्या कावळेसाद पॉईंट (Kavlesad Point) येथील जमिनीवर कोणाचा तरी डोळा आहे.

सकाळ डिजिटल टीम

''मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर नियती त्याला कदापिही माफ करणार नाही.''

सावंतवाडी : गेळे गावाच्या कावळेसाद पॉईंट (Kavlesad Point) येथील जमिनीवर कोणाचा तरी डोळा आहे. म्हणूनच ते माझ्याबद्दल ग्रामस्थांच्या मनात गैरसमज पसरवित आहेत. जमीन वाटपाचा कुठलाही प्रस्ताव मी अडविला नसून, हा प्रश्न मीच सोडविला आहे. आजही मी ग्रामस्थांसोबत आहे आणि त्यांच्यासोबतच राहणार आहे. त्यामुळे माझ्यावर गावबंदी आणायची कोणाची हिंमत आहे, असे प्रत्युत्तर राज्याचे शालेय शिक्षण तथा भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन दिले.

कोणाला राजकारण करायचे आहे त्यांनी करावे; परंतु राजकीयदृष्ट्या मला बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. तसे केल्यास ते मी सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. गेळे येथील ग्रामस्थांनी रविवारी (ता. २८) बैठक घेऊन कावळेसाद पॉईंटवरील जमिनीवरून केसरकर (Deepak Kesarkar) यांना गावबंदीचा इशारा दिला होता.

कावळेसाद पॉईंट या जागेला पर्यायी ५० एकर जमीन दिल्याचा केसरकर यांचा दावा चुकीचा असून त्यांनी या जमीन प्रश्नावरून खेळवत ठेवल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्याला श्री. केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘कावळेसाद पॉईंटवरील जमिनीवरून ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल; पण मुद्दामहून कोणी तरी गैरसमज पसरवत आहे. कावळेसादची जागा ही शासनाची आहे. त्यामुळे पर्यटनाचे सर्व प्रकल्प त्या जागेवर घेण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जमिनी विकत घेणारे आले आहेत.

माझ्यावर गाव बंदी आणायला कुणाची हिंमत आहे

अशांपैकी काहींचा या जमिनीवर डोळा असावा, म्हणून त्यांनी ग्रामस्थांना भडकावले आहे. मुळात आंबोली, गेळे, चौकुळ हे माझे दुसरे घर आहे, असे मी नेहमीच सांगत आलो आहे. माझ्यावर प्रेम करणारे लोक आजही त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक घरातील लोकांना आम्ही नावाने ओळखतो. गावात जाण्यासाठी रस्ता नसताना ते रस्ते मी माझ्या कार्यकाळात करून दिले. तेथील ग्रामस्थांच्या शेळ्या वाहून गेल्यानंतर त्यांना आर्थिक मदतही केली. त्यामुळे माझ्यावर गाव बंदी आणायला कुणाची हिंमत आहे. माझे गावकऱ्यांवर प्रेम आहे आणि मी हजार वेळा त्यांच्याशी चर्चेला जायला तयार आहे.

मी राजकारण सोडेन

गेळे गावचा जमीन प्रश्नाचा प्रस्ताव मी अडवला, असा एक तरी पुरावा दाखवावा. मी राजकारण सोडेन. कावळेसाद पॉईंटवरील जमीन शासन पर्यटन प्रकल्पासाठी वापरणार आहे. जी जमीन उरणार आहे, ती ग्रामस्थांना वाटप केली जाणार आहे. आंबोली, चौकुळ, गेळेचा जमीन प्रश्न गेली ३० वर्षे प्रलंबित होता. या जमीमिनीवर आजपर्यंत महाराष्ट्र शासनाची वहिवाट आहे. अशा जमिनीचे कधीही वाटप होत नाही; पण जमिनी शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी मी प्रयत्न केले. कुठलाही प्रस्ताव अडवलेला नाही. तसं असेल तर देवळात येऊन नारळाला हात लावण्यास मी तयार आहे.’’

नियती त्याला कदापि माफ करणार नाही

ते पुढे म्हणाले, ‘‘आंबोली व गेळे ग्रामस्थांचे म्हणणे होते की, खासगी जमीन वाटप करताना वन संबंधित जमीनही वाटली जावी. त्यामुळेच एवढे दिवस जमीन वाटपाचा प्रश्न राहिला होता; पण आता काहीजण नव्याने जमीन वाटप करतो म्हणून पुढे आले आहेत. त्यांना मला एकच सांगायचे आहे की, आमचे या गावांशी वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आहेत. आज तुम्ही त्यांना माझ्याबद्दल गैरसमज पसरवून वेगळे करू शकता; पण हे फार काळ टिकणार नाही. केव्हा ना केव्हा लोकांना समजून चुकेल की कोण खरे आणि कोण खोटे. ज्याला कोणाला या ठिकाणी राजकारण करायचे आहे किंवा निवडणूक लढवायची आहे, त्यांनी जरूर लढवावी; परंतु मला या वादामध्ये उगाच पाडू नये. मला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर नियती त्याला कदापिही माफ करणार नाही. कोणीही येऊन माझ्याबद्दल काही बोलेल हेही मी कदापी सहन करणार नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: सुसंस्कृत समाजात ‘बुलडोझर न्याय’ मान्य नाही; डीवाय चंद्रचूड यांनी आपल्या शेवटच्या निकालात योगी सरकारला फटकारले

२४ चेंडूवर १२० धावांचा पाऊस; ट्वेंटी-२० इतिहासातील वादळी खेळी, संघाच्या २०३ धावांत एकटीच्या १५० धावा, Video

Smartphone Tips : मोबाईल वापरताना सतत गरम होतोय? पटकन करून घ्या हे काम,नाहीतर होईल मोठे नुकसान

Vijay Wadettiwar : थापा मारणाऱ्या महायुतीला सत्तेतून खाली खेचा,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे बल्लारपुरात आवाहन

Akola West Assembly Election : विजय खेचून आणणे सोपे नाही....अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात घमासान

SCROLL FOR NEXT