gujarat drugs file photo
कोकण

Kokan Crime: औद्योगिक वसाहतीत पोलिसांनी अचानक टाकला छापा; १०७ कोटींचा मेफेड्रॉन जप्त

सकाळ डिजिटल टीम

Kokan Crime: रायगड तालुक्यातील लघु औद्योगिक वसाहतीत मेफेड्रॉन अमली पदार्थ तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत १०७ कोटी ३० लाख ३२ हजार ३७७ रुपये किमतीचा मुद्देमाल व मालमत्ता जप्त केली. कारखान्यातील तीन कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बेकायदा कारखान्याला सील ठोकण्यात आले.

मेफेड्रोन असे अधिकृत नाव असलेला हा अमली पदार्थ बाजारात मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशा वेगवेगळ्या टोपणनावांनी विकला जातो. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये खोपोली येथील कारखान्यातून त्याचा पुरवठा होत असे.

या पदार्थावर बंदी आहे. तरीही खोपोलीतील ढेकू गावात इंडिया इलेक्ट्रिक पोल्स मॅन्युफॅक्चरिंग कारखान्यात मेफेड्रॉन (एम. डी.) पावडर बेकायदा तयार केली जात असे. कारखान्यात एम डी पावडर तयार करण्याची करोडो रुपयांची यंत्रसामग्री इन्स्टॉल करण्यात आली आहे.

खालापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम व खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गुरुवारी छापा टाकला. येते तयार केलेली पावडर ही नार्को इन्स्पेक्शन कीटद्वारे तपासणी केली असता ती मेफेड्रॉन असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती रायगडचे अपर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी खालापूर येथे पत्रकार परिषदेत दिली.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

छाप्यात एकूण ८५ किलो २०० ग्रॅम वजनाची एम.डी. तयार पावडर जप्त करण्यात आली. या तयार मालाची एकूण किंमत १०६ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे.

त्याचबरोबर अंदाजे १५ लाख ३७ हजार ३७७ रुपये किमतीची एम. डी. पावडर बनवण्यासाठी वापरण्यात येणारी रसायने, ६५ लाख रुपये किमतीची रासायनिक प्रक्रियेसाठी असेम्बल केलेली साधनसामग्री ताब्यात घेण्यात आली आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १०७ कोटी ३० लाख ३७ हजार ३७७ रुपये आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT