ratnagiri sakal
कोकण

Kokan Ganeshotsav : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखरूप व्हावा

गणरायाला साकडे, नेत्यांकडून ने-आण करण्यासाठी वाहनांची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - गणेशोत्सवासाठी यावर्षी कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे शनिवार, रविवार जोडून असल्याने आणि पाऊसही फारसा नसल्यामुळे मुलाबाळांसहीत सर्व परिवार गावागावात दाखल झाले आहेत. कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही परिश्रम घेतले होते. लाखो चाकरमानी निर्विघ्नपणे कोकणात दाखल झाले आहेत. चाकरमान्यांचा परतीचा प्रवास ही निर्विघ्नपणे व्हावा, अशी प्रार्थना घरी आलेल्या गणरायाच्या चरणी भक्तगण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये

चाकरमानी कोकणात दाखल होताना महामार्गावर एसटीच्या लांब रांगा लागल्या होत्या. खासगी वाहनेदेखील आली आहेत. लवकरच निवडणुकीचा हंगाम असल्याने यावर्षी मात्र चाकरमान्यांसाठी एसटीला प्रायोजकत्व मिळाली. त्यामुळे एसटीच्या शेकडो गाड्या आणि खासगी गाड्याही महामार्गावर धावत होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अक्षरशः घाम फुटला होता. कोकणचा सर्वात मोठा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जाते. या सणाच्या निमित्ताने गावखेड्यातील वर्षभर बंद असलेली घरे या निमित्ताने उघडली जातात आणि घराघरात बाप्पांची प्रतिष्ठापना केली जाते.

आगामी काळात निवडणुकांचा हंगाम असल्याने यावर्षी राजकीय पुढाऱ्यांनी चाकरमान्यांसाठी वाहने उपलब्ध केली. एसटी, खासगी बस इतकेच काय एक ट्रेनसुद्धा सोडण्यात आली. तरीही मुंबई-गोवा महामार्गावरील गर्दी कमी होताना दिसून येत नव्हती. मागील तीन दिवस मुंबई-गोवा महामार्ग गर्दीने फुलून गेला होता. चाकरमानी खाचखळग्यातून, डायव्हर्शनमधून वाट काढत आपल्या गावात दाखल झाले.

चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष लक्ष घातले होते. गणेश उत्सवापूर्वी महामार्गाची एक लेन सुरू करण्याची घोषणा केली होती ती त्यांनी सत्यात उतरवली. मात्र मध्यवर्ती असणाऱ्या चिपळूण शहरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळली.

जिल्ह्यामध्ये एसटीच्या अडीच हजारहून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी त्यातील काही गाड्या आत्ताच चिपळूण आगारात थांबवून घेण्यात आल्या आहेत. यामुळे शहरातील शिवाजीनगर बसस्थानक एसटीचा तळ बनले आहे.

चिपळूण शहरात कोंडी

गणेशोत्सव काळात उड्डाणपुलाचे काम बंद ठेवावे, अशी मागणी केली जात होती, परंतु अद्याप हे काम सुरु आहे. त्यामुळे बहादूरशेख चौक येथे मोठी वाहतूक कोंडी होताना दिसून येत आहे. चिपळूण शहर बाजारपेठेत देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जाणवत असून, चाकरमान्यांच्या जादा गाड्या बाजारपेठेतूनच सोडण्यात येत आहेत. चाकरमान्यांना सोडून येणाऱ्या रिकाम्या गाड्या गुहागर बायपास मार्गे न वळविता बाजारपेठेतून येत असल्याने शहरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: सकाळ माध्यमाच्या नावे व्हायरल होत असलेली 'सिद्धिविनायक मंदिरावर वक्फ बोर्डाचा दावा' ही पोस्ट खोटी

आई झालेल्या दीपिका पादुकोणची उडवली खिल्ली; मग लिहिली त्याहून वाईट कमेंट, नेटकऱ्यांचा संताप अनावर

WBBL, Video: कडक! स्मृती मानधानाने पळत येत घेतला अफलातून कॅच, Video होतोय व्हायरल

Pune Assembly Election 2024 : खा मटण, दाबा आमचे बटण; मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न

Kelara Beach : हिवाळ्यात केरळ फिरायचं प्लॅन करत आहात का ? तर या ५ बीच ला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT