Election Voting Sakal
कोकण

कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीसाठी सरासरी पंचावन्न टक्के मतदान

जवळपास सगळ्याच मतदान केंद्रावर तुरळक मतदार मतदानासाठी येत असल्याचे चित्र होते.

सकाळ वृत्तसेवा

दोडामार्ग : कसई दोडामार्ग नगरपंचायत निवडणुकीकीसाठी (Electioon) दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी पंचावन्न टक्के मतदान (Voting) झाले. सकाळपासून संथ गतीने मतदान सुरु होते. जवळपास सगळ्याच मतदान केंद्रावर तुरळक मतदार मतदानासाठी येत असल्याचे चित्र होते. बहुतेक ठिकाणी महिला मतदारांची संख्या अधिक होती. बहुतेक प्रभागात मतदार कर्मचारी आहेत. त्यापैकी काहींची बदली झाली आहे. तर काही मतदार मृत्यू पावलेले आहेत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरण्याची शक्यता आहे.

तेरा जागांसाठी मतदान होत आहे. तेरा जागांसाठी ३६ उमेदवार नशीब आजमावत आहेत. प्रभाग क्रमांक १,४,८ व १० या ४ प्रभागातील निवडणुका १८ जानेवारीला होणार आहे तर सर्वच जागांचे निकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे १९ जानेवारीला जाहीर होतील.

यावेळेला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने निवडणूक प्रतिष्ठेची केली असली तरी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत व आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांनी प्रचारसभा घेवून आपल्याच उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. भाजपमधील गट तट आणि मतभेद सोडून तेराच्या तेरा उमेदवारांना विजयी करा असे आवाहन मंत्री राणे यांनी केले होते. सर्व मतदारांचे भवितव्य आज पेटीबंद होणार आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला , भाजपमधील गटबाजी शमली की ती विरोधकांच्या पथ्थ्यावर पडली हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT