Kokan Rain Update esakal
कोकण

Kokan Rain Update : कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग, चिपळूणमध्ये काय आहे पूरस्थिती? जाणून घ्या

रोहित कणसे

राज्यात कोसळत असलेल्या पावसामुळे कोकणात पूरस्थितीची परिस्थिती असून रत्नागिरी, चिपळूण, रायगड, पालघर या भागात जोरदार पाऊस सुरू असून बऱ्याच भागात पुरसदृश्य स्थिती तयार झाली आहे.

सध्या कोकणातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान संभाव्य पूराच्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतला जात आहे. दमरम्यान रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशावरून चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

पावसामुळे सद्यस्थिती काय आहे?

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार,

१. सध्या वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नाईक कंपनी/ मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी १ फूट पाणी भरलेले आहे. सध्या पाणी कमी होत आहे.

२. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एसटी स्टँज, नगरपालिका कार्यालय या ५ ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत.

३. नगरपालिका पथके ९ ठिकाणी तैनात आहेत.

४. तलाठी, पोलीस व एनडीआरएफ पथके ६ ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात ५ तलाठी, ३ पोलीस व ३ जवान आहेत. या पथकासोबत एकूण ४ बोटी आहेत. ६ ठिकाणे- नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप

५. सध्या एका कुटुंबातील ३ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे.

६. परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. कोणतीही समस्या नाही.

७. कुंभार्ली घाटात दरड कोसळलेली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.

८. कोकण रेल्वे- कोणतीही समस्या नाही. रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे.

९. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे. ते सर्वजण आपल्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरीत झाले आहेत.

१०. मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाने चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

वाशिष्ठी नदीपात्रात न जाण्याचा नागरिकांना इशारा

रत्नागिरी येथे कोळकेवाडी धरण व धरण परिसरात काल रात्री ८ वाजल्यापासून कोळकेवाडी धरण व धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सद्यस्थितीत महाजेनकोचे चारपैकी तीन युनिट चालू असल्यामुळे वक्रदार द्वारे सांडव्यावरुन पाणी विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बोलादवाडी नाला व वाशिष्ठी नदी पात्रालगत नागरिकांना न जाण्याचा इशारा देण्यात यावा, असे पत्र कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग आलोरेचे उपविभागीय अभियंता यांनी कोळकेवाडी, नागवे, आलोरे, पेंढाबे, खडपोली, पिंपळी खु., पिंपळी बु., सती व खेर्डी सरपंचांना पाठवले आहे.

रत्नागिरीत पावसाची स्थिती

1. बोरघर (कातकरी वस्ती) येथील 4 घरांना पाणी लागले असल्याने 4 घरांतील 22 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले आहे.

2. मौजे भोस्ते गावातील रस्त्यावर जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद करण्यात आली आहे. अलसुरे येथील मजिदीचे भोंग्यावरून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहणेबाबत सुचित केले आहे.

3.खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.

4. नारिंगी नदीचे पुराचे पाणी कंन्या शाळा जवळ रस्त्यावर आले असल्याने दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.

5. आंबावली येथील धनगर वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याला भेगा पडल्या असून रस्त्यांवर झाड पडले आहे.

6. खारी गावात पुराचे पाणी येण्याची शक्यता असल्याने शेजारील घरात 4 कुटुंबांचे सुरक्षीत ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

6. खेड खांब तळे येथील झोपड पट्टी मधील नागरिक यांना नगर पालिका बालवाडी येथील शाळेत शिफ्ट केले आहे.

7. जगबुडी नदी बाजूस असलेली झोपडपट्टी मधील लोकांना मुकादम हायस्कूलमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.

8. खेड मधील सर्व शाळांना मा.जिल्हाधिकारी महोदयांनी आज सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT