Harnai Port Fish Market esakal
कोकण

Harnai Port : हर्णै बंदरात मासळी खरेदीसाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दी; वाढत्या पर्यटकांमुळं जत्रेचं स्वरूप, रोज लाखोंची उलाढाल

पर्यटकांची सकाळी आणि संध्याकाळी रोजच हर्णै बंदरात मासळी खरेदीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे.

राधेश लिंगायत

दापोली तालुक्याच्या किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल रिसॉर्टमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे.

हर्णै : दिवाळी सुटीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळी आणि संध्याकाळी रोजच हर्णै बंदरात मासळी खरेदीला रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली आहे. त्यामुळे हर्णै बंदराला (Harnai Port) जत्रेचे स्वरूप आले. हंगाम सुरू झाल्यापासून किमान बंदरामध्ये रोजची लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

सप्टेंबरपासून पर्यटन उद्योगाला बऱ्यापैकी सुरवात होत असताना पर्यटकांची दिवाळी सुटीच्या निमित्ताने प्रचंड आवक सुरू झाली आहे. या परिसरातील हर्णै बंदर हे मासळीचे मोठे बंदर असल्याचे पर्यटकांना माहीत झाले आहे. त्यामुळे पर्यटक आवर्जून ताजी व सुकी मासळी खाण्यासाठी व खरेदीसाठी हजेरी लावत आहेत.

या वेळेस मासळीची आवक खूपच कमी असल्याने बंदरामध्ये असणाऱ्या चिमणी बाजारामध्ये मासळी खरेदी करण्याचे आकर्षण पर्यटकांमध्ये दिसून येत आहे. हर्णै बंदर हे दापोली तालुक्याचे मासळी उद्योगाचे मुख्य केंद्रबिंदू आहे. महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील असो किंवा परदेशातील पर्यटक असो मासळी खरेदीसाठी हर्णै बंदरातच येतात. दिवाळीच्या १५ दिवसांच्या सलग सुटीमुळे पाडव्याच्या मुहुर्तावर पर्यटक हजर झाले आहेत.

दापोली तालुक्याच्या किनारपट्टीला व किनाऱ्यावर असणाऱ्या हॉटेल रिसॉर्टमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे. दापोलीमध्ये आलेला पर्यटक हर्णै बंदरामध्ये आल्याशिवाय माघारी फिरत नाही. आता येणाऱ्या मासळीमध्ये म्हाकूळ, बेबी म्हाकूळ, बग्गा व फिशमिलचे प्रमाण बऱ्यापैकी असून खाण्यासाठी लागणाऱ्या मच्छीचे प्रमाण खूप कमीच आहे; परंतु रोज जाणाऱ्या छोट्या होड्या किरकोळ मासळी मारून आणत आहेत.

तालुक्यातील बहुतांशी हॉटेल व रिसॉर्टना झिंगा फ्राय, पापलेट थाळी, सुरमई थाळी, कोळंबी बिर्याणी आदी मासळीच्या चटकदार मसालेदार डिशेस खाण्यासाठी पर्यटक कोकणात येऊ लागले आहेत. सध्या केळशी, हर्णै, पाजपंढरी येथील छोट्या बोटी डेलीसाठी म्हणजे सकाळी मासेमारीला जाऊन संध्याकाळी मासळी विक्रीच्या वेळेवर विक्रीसाठी मासळी घेऊन बंदरात येतात.

अशा छोट्या बोटींच्या आणि मोठ्या नौकाच्या कमी प्रमाणात येणाऱ्या मालावरच सध्या हर्णै बंदरात बाजार चालू आहे. छोट्या बोटी मात्र पापलेट, सुरमई, कोळंबी, बांगडा, बोंबिल आदी प्रकारची मासळी घेऊन येत असल्याने येणाऱ्या पर्यटकांची चंगळ होत आहे.

आम्ही भोर येथून आलो असून हर्णै येथे दरवर्षी फिरण्यासाठी आणि मासे नेण्यासाठी येतो. या ठिकाणी सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी, बोंबिल असे वेगवेगळे मासे मिळतात.

-ओंकार सोनावणे, पर्यटक

शनिवारी, रविवारी अशा सुटीला पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे माशांना उठाव आहे. बाजारात विक्रीसाठी सुरमई, बांगडा अधिक आहे. पापलेट, कोळंबी काही प्रमाणात आहेत. दरही पर्यटकांच्या आवाक्यात आहेत.

-द्रौपदी पाटील, मच्छी विक्रेत्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT