mahad crime theft cases police action 1 50 cr fund for security raigad  Sakal
कोकण

Mahad News : महाडमध्ये सुरक्षेसाठी दीड कोटी, चोऱ्यांच्‍या घटनात वाढ ; जिल्‍हा गृहनिर्माण महासंघाचा पुढाकार

घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक नुकतीच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आयोजित करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

महाड : गेल्‍या काही दिवसांपासून महाड शहरात वाढत असलेल्या चोरी व घरफोडीच्या घटनांबाबत पोलिसांशी समन्वय साधण्यासाठी जिल्हा गृहनिर्माण महासंघाने पुढाकार घेतला आहे.

घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर शहरातील गृहनिर्माण संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक नुकतीच चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आयोजित करण्यात आली होती.

यावेळी महाड नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक राम चकोर यांनी नगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने सुचविण्यात आलेल्या १०४ ठिकाणी सुमारे एक कोटी ७० लाख रुपये खर्चून ही विशेष सुरक्षा यंत्रणा लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती दिली.

पंधरा दिवसांपासून शहरातील घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी त्वरित तपास करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रहिवाशांकडून देण्यात आला होता. त्‍या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक चवदार तळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी महाडचे पोलिस उपअधीक्षक शंकर काळे, महाड शहर पोलिस ठाण्याचे उपपोलिस निरीक्षक मंदार माने यांच्‍यासह नगर परिषदेचे अधिकारी दीपक महाडिक, कार्यालय अधीक्षक राम चकोर, महासंघाचे अध्यक्ष राजाराम पाटील,

चंद्रकांत लाड उपस्थित होते. यावेळी पोलिस उपअधीक्षक शंकर काळे यांनी महाडची भूमी ही ऐतिहासिक व क्रांती भूमी असून या ठिकाणी घडलेल्या घटना या दुर्दैवी आहेत. येत्या दोन ते चार दिवसांमध्ये या संदर्भातील आरोपींना आपण गजाआड करू, असा विश्वास यावेळी उपस्‍थितांना दिला.

विविध चोरीच्‍या घटना

महाड शहरामध्ये पंधरा दिवसांत घडलेल्या घरफोड्यांमुळे नागरिक भयभीत झाले असून घरफोड्यांमधील तपास करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. प्रभात कॉलनीमध्ये एका व्यापाऱ्याच्या घरी चोरी होऊन पन्नास लाखांचा ऐवज चोरण्यात आला, तर याच ठिकाणी आणखी एका घरातील साडेपाच लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला.

शहरातील प्रभात कॉलनी, चवदार तळे, कोटेश्वरी तळे या परिसरात चोरीच्या घटना वाढल्‍या आहेत. अनेक सोसायटींमध्ये रात्रीच्या वेळी चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. हातात लोखंडी रॉड घेऊन पाच ते सहा चोरटे राजरोसपणे फिरताना दिसतात. शहरात दोन ठिकाणी भरदिवसा घरफोड्या करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

...नाहीतर भाजप घाईघाईत गौतम अदानींना मुख्यमंत्री बनवेल, मविआच्या नेत्याचा खोचक टोला, नेमकं काय म्हणाले?

K.K. Muhammed : ‘ते बारा स्तंभ’ राममंदिराचे अवशेष...पुरातत्त्वविद के.के. मोहम्मद यांची पद्म फेस्टिव्हलमध्ये माहिती

IND vs AUS: पर्थ कसोटीत ऋषभ पंतसोबत IPL ऑक्शनची चर्चा; हाय व्होल्टेज सामन्यातील दोन्ही संघातील खेळाडूंच्या संवादाचा Video Viral

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

SCROLL FOR NEXT