Malvan Crime esakal
कोकण

Malvan Crime : विवाहितेला पेट्रोल ओतून पेटविणाऱ्या पहिल्या पतीला अटक; दुसरे लग्न केल्याच्या रागातून कृत्य

सकाळ डिजिटल टीम

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सुशांत गोवेकर पसार झाला होता.

मालवण : शहरातील बसस्थानक येथील एका डायग्नोस्टिक लॅबमध्ये (Diagnostic Lab) काम करणाऱ्या सौभाग्यश्वरी गोवेकर (वय ३५, रा. धुरीवाडा) या विवाहितेवर पेट्रोल ओतून पेटविणारा तिचा पहिला पती सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०, रा. धुरीवाडा) याला आज सकाळी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कुंभारमाठ येथून ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

त्याच्यावर अटकेची कारवाई केली असून, आज (ता. २७) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली. दरम्यान, मृत्यू झालेल्या प्रीती केळुसकर हिच्यावर आज दुपारी धुरीवाडा येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूर्वाश्रमीची प्रीती केळुसकर ही विवाहिता येथील बसस्थानकातील एका लॅबमध्ये काम करत होती. बुधवारी (ता. २५) दुपारच्या सुमारास ती काम करत असताना तिचा पहिला पती सुशांत गोवेकर याने लॅबमध्ये घुसून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून लायटरने पेटवून दिले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. आग लागल्याने प्रीती आरडाओरड करत लॅबबाहेर आली. हा प्रकार स्थानिक नागरिकांना दिसताच त्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविली. यात प्रीती ही गंभीररित्या भाजल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना रात्री तिचा मृत्यू झाला.

भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर सुशांत गोवेकर पसार झाला होता. मालवण पोलिस (Malvan Police) व स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाद्वारे त्याचा मालवण, कुडाळ, ओरोस, कणकवली परिसरात शोध घेण्यात आला; मात्र तो सापडून आला नाही. आज सकाळी तो कुंभारमाठ परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने त्याला पकडत मालवण पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी केलेल्या चौकशीत प्रीतीने दुसरे लग्न केल्याच्या रागातूनच हा प्रकार केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.

सौभाग्यश्वरी गोवेकरला पहिला पती सुशांत गोवेकर याने पेट्रोल ओतून पेटविले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानुसार खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे, ज्वलनशील पदार्थ टाकून गंभीर दुखापत करणे यांसह अन्य कलमांनुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यासोबत अन्य कोणी होते का, याचा तपास केला जात आहे. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेतले जाणार आहेत. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे. कोल्हापूर येथील न्यायवैदिक पथकाद्वारे घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. सुशांत याला अटक केली असून आज (ता. २७) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

-प्रवीण कोल्हे, पोलिस निरीक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

Assembly Elections: विधासभेआधी भाजपला धक्का? नितेश राणेंची मुस्लिम विरोधी भूमिका, नाराज नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

IND vs BAN, Test: ऑन कॅमेरा राजीव शुक्ला अलर्ट! मॅच पाहताना होते रिलॅक्स पण घडलं असं काही की...

SCROLL FOR NEXT