मुंबई : आज सकाळी मुंबई गोवा महामार्गावर खेडनजीक एक धक्कादायक घटना घडलीये. सकाळी सात वाजता घडलेल्या घटनेने सर्वांच्याच अंगावर शहारे आले आहेत. ही बातमी वाचल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. मुंबई गोवा महामार्गावर भरणेनजीक एका धावत्या स्विफ्ट कारमध्ये एका तरुणाने स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी सात वाजताची आहे. धावत्या गाडीत स्वतःच्या हाताची नस कापून घेतलेल्या तरुणाची या गावात सासुरवाडी असल्याचीही माहिती समोर येतेय.
तरुण भरणे नाका इथून साताऱ्याच्या दिशेने जात होता. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आपल्या नातेवाईकांना फोनवरून आपण करणार असलेल्या कृत्याची कल्पना दिली होती. त्याने फोन करून आपण आपले जीवन संपवत असल्याचं नातेवाईकांना सूचित केले होते. नातेवाईकांना ही धक्कादायक माहिती मिळताच खेडमधील काही ओळखीच्यांना त्यांनी सदर प्रकार सांगितला आणि त्यानंतर काही समाजसेवकांच्या मदतीने या तरुणाचा शोध सुरु झाला. खेडमधीलच काही समाजसेवकांना सदर तरुण दिसल्यानांतर त्याचा पाठलाग केला गेला. पाठलाग केल्यानंतर त्याला पकडून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
महत्त्वाची बातमी : कोरोनाबाधितांना होऊ शकतो फटाक्यांच्या धुराचा त्रास, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे गरजेचे
कारमध्ये होता रक्ताचा सडा :
मिळालेल्या माहितीनुसार समाजसेवक या कारचा पाठलाग करत होते. कार चालकाने पेट्रोलपंपावर कार थांबवल्यानंतर समाजसेवकांनी त्याला ताब्यात घेतलं. समाजसेवकांनी जेव्हा त्याच्या कारकडे धाव घेतली तेव्हा या कारमधील दृश्य पाहून त्यांनाही जबर धक्का बसला. कारण संपूर्ण गाडीत रक्ताचा सडा पडलेला पाहायला मिळत होता. त्या व्यक्तीचे कपडे देखील रक्ताने पूर्णतः माखले होते. या तरुणाने आपल्या हाताची नस कापून घेतली होती.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देखील कळवण्यात आली आहे. सदर आता या तरुणाला कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. खेड पोलिस याबाबत पुढील तपस करत आहेत.
man took extreme step while driving car on mumbai goa highway
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.