Mandangad Sagari Highway esakal
कोकण

Konkan Coast : मंडणगडच्या विकासाला मिळणार सागरी मार्गामुळे चालना; बाणकोट-बागमांडला 'सी लिंक'ची आशा

कोकण किनारपट्टीवरील (Konkan Coast) परिसर विकासाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

महामार्गाजवळील मंडणगडमधील आंबडवे, किल्ले मंडणगड, हिंमतगड (बाणकोट), वेळास या प्रसिद्ध स्थळांपर्यंत दळणवळण सोयीचे होणार आहे.

मंडणगड : रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाकरिता (Sagari Highway) सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादनाची अधिसूचना जारी केली. त्यामुळे अनेक वर्षे केवळ नियोजन आणि चर्चेच्या गुऱ्हाळ्यात प्रलंबित राहिलेला सागरी मार्ग पूर्ण होत असल्यामुळे कोकण किनारपट्टीवरील (Konkan Coast) परिसर विकासाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. त्यामध्ये दुर्लक्षित मंडणगडसह कोकणला फायदा होणार आहे.

कोस्टल वे प्रकल्पात किनारी भागाजवळील शहरांच्या विकासाचे उद्दिष्ट्य आहे. मंडणगड तालुक्याच्या दक्षिणेकडील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर या गावांचा तसेच नजीकच्या दापोली तालुक्यातील काही गावांचा नियोजित आराखड्यात व अधिसूचनेत समावेश असल्यामुळे त्या तालुक्यांच्या विकासाच्या कक्षा रूंदावणार आहेत.

याशिवाय महामार्गाजवळील मंडणगडमधील आंबडवे, किल्ले मंडणगड, हिंमतगड (बाणकोट), वेळास या प्रसिद्ध स्थळांपर्यंत दळणवळण सोयीचे होणार आहे. कोकणातील किनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा हा सागरी महामार्ग असावा. त्यातून कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. मुंबईतून तळकोकणात जाण्याचे अंतर कमी होईल, मुंबई-गोवा महामार्गाला पर्याय ठरू शकेल, अशा विविध उद्दिष्टांसाठी सागरी मार्गाची निर्मिती केली जाणार होती.

या पुलामुळे वेसवी, उमरोली, म्हाप्रळ, निगडी, उंबरशेत, गोठे-बंदरवाडी, पडवे, शिपोळे या सावित्रीनदी किनाऱ्यालगतच्या गावात बंदर विकासालाही गती मिळू शकेल. सागरी महामार्गासाठी मंडणगड तालुक्यातील बाणकोट, नारायणनगर, वेळास, साखरी, गावातील सुमारे १५३४.६८ जमीन अधिगृहित करण्यात येणार आहेत. मंडणगड (खारी, साखरी) व दापोलीला (केळशी) जोडणारा केळशी पुलाचा प्रश्न देखील या निमित्ताने मार्गी लागेल, अशी चिन्ह आहेत.

गेली दहा वर्षे काम बंदच

रेवस रेड्डी सागरी महामार्गातील महत्वाकांशी प्रकल्पाचा भाग खाडी जोड प्रकल्पांतर्गत विद्यमान खासदार व तत्कालीन अर्थमंत्री खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात बाणकोट-बागमांडला सागरी सेतूचे काम सुरू झाले. सुरवातीस जोरदार सुरू असलेले सीलिंकचे काम अर्धवट बांधलेल्या पिलर्सनंतर ठप्प झाले. ते मागील दहा वर्षांच्या प्रदीर्घ कलावधीत बंद आहे.

अंतुलेंनी मांडली होती संकल्पना

मागील अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला. ऐंशीच्या दशकात तत्कालीन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी सागरी मार्गाची संकल्पना मांडली. मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी या दृष्टीने पावले उचलली. पुलांची कामे पूर्ण न झाल्यामुळे मार्ग रखडला. त्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार संभाळताना या पुलांना गती देण्याचा प्रयत्न केला. बाणकोट खाडीवरील पुलाचे काम सुरू करून घेतले. पुन्हा सत्तांतरानंतर सागरी मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे.

पर्यटकांसाठी आकर्षण

रायगडमधील बागमांडला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील बाणकोट या दरम्यान खाडीवर वरळी सीलिंकप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे महत्वाकांक्षी सागरी सेतू बांधण्याचे काम २०१३ पासून सुरू केले आहे. पुलाची लांबी जोडरस्त्यासह १८०० मीटर इतकी असून, रूंदी १२.५० मीटर इतकी आहे. पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांचे काम वरळी सीलिंकप्रमाणे केबल स्टे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने हा पूल पर्यटकांसाठी आकर्षण तर दळणवळणासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

US Election : अमेरिकेला मिळणार पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष? कमला हॅरिस यांच्या गावी विजयाची उत्कंठा

SCROLL FOR NEXT