Masked booby bird spotted in murud korlai beach raigad sakal
कोकण

Masked Booby Bird : मुरुड कोर्लई समुद्रकिनारी दुर्मिळ 'मास्कड बुबी' पक्षाचे दर्शन

रायगड जिल्ह्यात आढळलेला बहुदा पहिला प्रौढ पक्षी

अमित गवळे - सकाळ वृत्तसेवा

Pali News : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथील कोर्लई समुद्रकिनारी लाईट हाऊस जवळ रविवारी (ता.13) दुर्मिळ मास्कड बुबी masked booby (मोठा समुद्री कावळा) पक्षाचे दर्शन झाले. रायगड जिल्ह्यात बहुदा पूर्ण वाढ झालेला हा पहिला पक्षी दिसला असण्याची शक्यता पक्षी व वन्यजीव अभ्यासकांनी वर्तवली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अलिबाग येथील वन्यजीव अभ्यासक आणि वन्यजीव रक्षक डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सकाळला सांगितले की त्यांना मुरुड कोर्लई येथून काही ओळखीच्या पर्यटकांनी फोन करून सांगितले की येथे एक वेगळा पक्षी दिसत असून तो आजारी किंवा दमलेला वाटत आहे.

काही हौशी पर्यटक या पक्षाला उचलून घेत आहेत, तर काही सेल्फी काढत आहेत. त्यांनी या पक्षाचा फोटो डॉ. प्रसाद दाभोळकर यांना पाठवला, डॉ. दाभोळकर यांनी हे फोटो लागलीच पक्षी अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना पाठवले आणि हा पक्षी दुर्मिळ मास्कड बुबी (मोठा समुद्री कावळा) असल्याची खात्री केली.

त्यानंतर त्यांनी ताबडतोब मुरुड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियांका पाटील यांना याबाबत कळवले. प्रियांका पाटील यांनी वनरक्षक भगवान पिंगळे यांना लगेच जागेवर पाठविले मात्र तो पर्यंत हा पक्षी तेथून निघून गेला होता.

डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी सकाळला सांगितले की हा दुर्मिळ समुद्री पक्षी आहे. कदाचित रस्ता भरकटुन येथे किनारी आला असावा. स्ट्रेस (थकवा) निघून गेल्यावर तो तेथून निघून गेला असावा.(Latest Marathi News)

मास्कड बुबी म्हणजेच मोठा समुद्रीकावळा या पूर्ण वाढीच्या पक्ष्याची रायगड च्या समुद्री किनाऱ्याहून बहुदा पहिलीच छायाचित्रित नोंद असावी. यापूर्वी काही अप्रैाढ असलेले पक्षी किनाऱ्यांहून बचाव करण्यात आले होते. बुबी हे पक्षी किनाऱ्यापासून खूप दूर उष्णकटिबंधीय महासागरामध्ये राहणे पसंत करतात. फक्त प्रजनन काळातच हे पक्षी जमिनीवर तेही समुद्री बेटे व किनाऱ्याजवळील उंच कड्यांमध्ये घरटी करणे पसंत करतात. भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील या पक्ष्यांचे दर्शन अतिशय दुर्मिळ आहे.

- शंतनु कुवेसकर, वन्यजीव अभ्यासक, माणगाव, रायगड

अशा प्रकारचा पक्षी जर कोणाला दिसून आला तर त्यांनी ताबडतोब वनविभागाला कळवावे. तसेच अशा दुर्मिळ पक्षासोबत सेल्फी काढू नये व त्याला हाताळू देखील नये.

- प्रियांका पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुरुड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! लोकप्रिय मालिकेच्या सेटवर मोठी दुर्घटना; शुटिंगदरम्यान कॅमेरा असिस्टंटचं निधन

Latest Maharashtra News Updates live : काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

Nitin Gadkari: आमदार निवडताना जात का महत्त्वाची? नितीन गडकरींचा मतदारांना सवाल

Vastu Tips: घरात 'या' ठिकाणी ठेवा मोरपिस, कुटुंबात होईल भरभराट

व्यसनाधीन मुलाच्या त्रासाला कंटाळून बापाने डोक्यात टिकाव घालून मुलाचा केला खून, आदित्यने मुलगी पळवून आणली अन्..

SCROLL FOR NEXT