Kokan  Sakal
कोकण

जुळ्या बहिणींची कमाल; १६ लढतीत १४ सुवर्ण कमाईने धमाल

शेपाली, सेजल खैरे; जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंगमध्ये उमटवली मुद्रा

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : मंडणगड (mandangad) तालुक्यातील कादवण-बौद्धवाडीतील शेपाली व सेजल या जुळ्या बहिणीनी महानगरांत बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटविला असून जिल्हा, राज्य व देश पातळीवर १६ स्पर्धां खेळून १४ सुवर्णपदके, ६ रौप्य, ११ कास्य पदके पटकावली आहेत. दोन्ही बहिणीनी आता राज्यात आपला दबदबा निर्माण केला असून राष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित करीत कोकणातील या जुळ्या खैरे भगिनींनी विजयी घोडदौड चालू ठेवली आहे.

तालुक्यातील कादवण-बौद्धवाडी गावचे रहिवासी असणारे आनंद खैरे नोकरीनिमित्त आपल्या कुटुंबासह मुंबईतील गोवंडी भागात राहतात. आनंद यांना तीन मुली व एक मुलगा आहे. दोघीही तेरावीमध्ये शिक्षण घेत आहेत. त्या ब्राऊन बेल्ट सेकंड स्टेपमध्ये आहेत. घरची परिस्थिती सर्वसामान्य असूनही वडिलांच्या प्रोत्साहानामुळे त्यांना बळ मिळाले. २०१५ पासून त्या विविध स्तरावर बॉक्सिंगमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. सहा वर्षांत मुंबई, नागपूर, खांडवा (मध्य प्रदेश), शिर्डी, वर्धा, हैद्राबाद अशा ठिकाणी राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरावर विशु फाईट, किक बॉक्सिंग, थाई बॉक्सिंग, कराटे स्पर्धा विविध वयोगटातून खेळल्या आहेत. अरविंद वाघमारे व बाळू सोनावणे हे त्यांचे प्रशिक्षक घेतले आहे.

तीन वेळा अंतिम सामन्यांत समोरासमोर

अनेक स्पर्धेत सहभागी होताना तीन वेळा अंतिम सामन्यात दोघी बहिणी लढतीत समोरासमोर खेळल्या. मात्र, स्पर्धेत खेळताना एक खेळाडू म्हणून त्याच जोमाने एकमेकींसमोर डावपेच टाकताना प्रेक्षकांना उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले. याची एक आठवण म्हणजे नागपूर येथे पार पडलेल्या १४ वर्षाखालील स्पर्धेत झालेल्या सहा लढतीत एकही सामना न हरता अंतिम सामन्यात दोघीही बहिणी समोरासमोर उभ्या ठाकल्या. अंतिम सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांनी दोन्ही बहिणींचे कोर्टवर आगमन होताच उभे राहून टाळ्यांच्या कडकडाट केल्या.

शेपालीची कमाई -

सुवर्णपदके- ९, रौप्य-३,

कास्य-४

एकूण-१६

सेजलची कमाई

सुवर्णपदके- ५, रोप्य-३, कास्य-७- एकूण-१५

शेपाली व सेजल यांनी विविध स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत. राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळ करून कोकणासह देशाचे नाव लौकिक करावे, अशी इच्छा आहे. दोघींचीही अथक मेहनत पाहता वडील म्हणून त्यांची आवड जोपासत खंबीरपणे पाठीशी उभा आहे.

- आनंद खैरे, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT