mini dam work scam konkan sindhudurg 
कोकण

अजब...भूमिपूजन एकीकडे, बंधारा दुसरीकडेच 

सकाळ वृत्तसेवा

मालवण (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील कालावल खाडीपात्रातील मसुरकर जुवा बेट येथे लाखो रुपये खर्चून बांधलेला धूप प्रतिबंधक बंधारा लोकवस्ती सोडून दुसरीकडेच बांधल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भूमीपूजन एकीकडे, बंधारा दुसरीकडे असा हा सगळा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 

गेली अनेक वर्षे मसुरे येथील मसुरकर जुवा बेटावरील स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काही मीटरचे काम यावर्षी करण्यात आले; मात्र लोकवस्ती एकीकडे आणि बंधारा दुसरीकडे बांधला आहे. या बंधाऱ्यासाठी मंजूर निधीही संपला आहे. लोकवस्तीच्या ठिकाणी बंधारा न बांधता दुसरीकडेच बंधारा बांधल्याने त्याचा स्थानिक ग्रामस्थांना कोणताही फायदा होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घरे, देवस्थान असलेल्या ठिकाणी बंधारा बांधण्याची मागणी पूर्ण न झाल्याने ग्रामस्थ संतप्त बनले आहेत. 

कालावल खाडीपात्रात मसुरकर जुवा, खोत जुवा, सावंत जुवा, परुळेकर जुवा, सय्यद जुवा यासह काही अन्य बेटे अस्तित्वात आहेत. यातील काही बेटांवर मनुष्यवस्ती आहे. यातील 900 मीटरचा घेर असलेल्या मसुरकर जुवा बेट व अडीच हजार मीटर घेर असलेल्या खोत जुवा बेटावर गेली काही पिढ्या लोकांचे वास्तव्य आहे. बेटावर दर तीन वर्षांनी होणाऱ्या भवानी मातेच्या उत्सवास हजारो भाविक उपस्थिती दर्शवितात.

दोन्ही बेटांवर असलेली माड बागायती हेच या ग्रामस्थांचे उपजीविकेचे प्रमुख साधन आहे. मुलांच्या शाळा, रोजगार याचा विचार करता काही कुटुंबांनी बेटाबाहेर स्थलांतर केले आहे. बेटावरील काही जुनी घरे कोसळली आहेत. त्यांचे केवळ अवशेष दिसून येतात; मात्र काही लोकवस्ती आजही तेथे आहे. 
खाडीतील बदलत्या पाण्याच्या प्रवाहामुळे माड बागायती मोठ्या प्रमाणात गिळकृंत होऊ लागली. बेटांची होणारी धूप लक्षात घेता या बेटांचे अस्तित्व धोक्‍यात आले होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी धूप प्रतिबंधक बंधारा होण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन्ही बेटांच्या ठिकाणी शासनाने धूप प्रतिबंधक बंधारे मंजूर केले. या बंधाऱ्यांच्या कामासाठी सुमारे 2 कोटीहून अधिक रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला. मसुरकर बेटाच्या ठिकाणी शेकडो मीटरचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र या कामाबाबत स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

शासन काय दखल घेणार? 
किती मीटर बंधाऱ्यासाठी किती निधी खर्च झाला, तो कोणत्या दिशेने व कोणत्या प्रकारे बांधण्यात येणार याबाबत कामाच्या ठिकाणी कोणताही फलक संबंधित विभागाकडून लावलेला नाही. भूमिपूजन एकीकडे आणि काम दुसरीकडेच झाले आहे. त्यामुळे पतन विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी शासनाकडे, विरोधी पक्षनेते, प्रशासनाकडे केली आहे. त्यामुळे या चुकीच्या कामाबाबत शासन कोणती दखल घेणार याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT