कणकवली ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करत असताना कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. मीही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आहे. त्यामुळे या जिल्ह्याचा विकास सर्वतोपरी व्हावा हा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
पालकमंत्री सामंत जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी वैभववाडी त्यानंतर कणकवलीत शिवसेना पक्ष कार्यकर्ता मेळावा घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, पक्षाचे नेते प्रदीप बोरकर, युवा नेते संदेश पारकर, सर्व नगरसेवक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत आमचं ठरलंय
श्री. सामंत म्हणाले, ""महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि जिल्ह्यातला प्रत्येक माणूस पालकमंत्री आहे असं वाटलं पाहिजे. किल्ल्याचा विकास निश्चितच होईल. निधी कमी पडू देणार नाही. पर्यटनातून विकास ही आपली संकल्पना असून गोव्यापेक्षा सरस पर्यटन सिंधुदुर्गात व्हावं या दृष्टिकोनातून आपले पुढचे पाऊल असेल. पहिला दौरा माझा शिवसेना कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आहे. त्यामुळे ही भेट कशासाठी आहे. माझ्या डोळ्यासमोर 2022 मधील जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. जिल्हा परिषदेवर भगवा फडण्यासाठी आपले 12:35 हे टार्गेट ठेवून प्रत्येकाने काम करूया. पालकमंत्री जिल्ह्याचा झाल्यानंतर मला अनेक जणांचे फोन आले; पण मी कोणालाही नाहक त्रास देणार नाही. माझा तो पिंड नाही. माझे ते संस्कारही नाहीत, रत्नागिरी जिल्ह्यात मी चार वेळा आमदार झालो. आता सिंधुदुर्गाची जबाबदारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर सोपवली आहे ते काम यशस्वीपणे करीन.'' सतीश सावंत, संदेश पारकर यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजू शेटये यांनी केले. यावेळी कणकवली शहर तसेच तालुका पत्रकार संघाच्यावतीनेही उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - भूर्दंड ! आंब्याच्या फुलोऱ्यावर यांचा हल्ला
""मी जसा रत्नागिरीचा आहे तसाच सिंधुदुर्गाचा ही आहे; पण माझ्या बाबतीत काही लोक नाहक बदनामी करत आहेत. मच्छीमारांमध्ये गैरसमज पसरवला जात आहे; पण आजच आश्वासन देतो, की मी एलईडी मच्छीमारीच्या विरोधात आहे हे प्रत्येकाने ध्यानात घ्यावे. तसा शब्द आज तुम्हाला देतो,'' असेही सामंत म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.