MLA bhaskar jadhav clarification of his viral video clip in ratnagiri 
कोकण

'सोशल मिडायावरील व्हायलर व्हिडीओमध्ये झालीये छेडछाड'

मुझफ्फर खान

चिपळूण : शारदेच्या मंदिरात घडत असलेला वाद थांबवण्यासाठी मी गेलो होतो पण माझ्या राजकीय हितचिंतकाकडून मुळ व्हिडीओमध्ये छेडछाड करून तो व्हायरल करण्यात आला आहे. अशी प्रतिक्रिया गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली. 

ते म्हणाले, 6 ऑक्टोबरला तुरंबव येथील शारदा देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव साजरा करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत पंडित कुटूंबातील सदस्य देवीची ओटी भरून रूपे लावेल असा प्रस्ताव ठेवण्यात आला. त्याला अजित पालशेतकर आणि श्रीधर पालशेतकर यांनी विरोध करत इतर समाजालाही संधी मिळाली पाहिजे अशी मागणी केली. त्यानंतर दिगंभर पंडित यांनी बैठकीतच अजित पालशेतकर याच्या कानाखाली मारून त्याला जितावाचक शब्द वापरले. श्रीधर पालशेतकर यांनी नाराजी व्यक्त करून अजित पालशेतकरची भूमिका योग्य असल्याचे सांगितले. त्यानंतर पंडित यांनी अजित पालशेतकर याचा शर्ट धरून 'तू बाहेर गावासमोर चल, तुला दाखवतो' असे सांगितले. 

संचालक मंडळाची बैठक असताना कोरोना काळात मंदिराच्या बाहेर दोनशे लोकांची गर्दी जमली होती. तेथे गैरप्रकार घडू नये म्हणून अजित पालशेतकर यांनी मला फोन करून घडला प्रकार सांगितला. मी सावर्डे पोलिस ठाण्यात फोन केला. पोलिस ठाण्यातून प्रतिसाद मिळाला नाही. गावातील अनोळखी व्यक्तीने मला फोन करून तातडीने या विषयात लक्ष देण्याची मागणी केली. मी गावातच होतो मंदिरात गेलो. जातीवाचक शिवीगाळ करणे बरोबर नाही. जर गुन्हा दाखल झाला तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतील. मंदिराची बदनामी होईल असे मी तेथे उपस्थितांना समजून सांगत दोन्ही बाजूच्या लोकांना वेगवेगळ्या दिशाना ढकलून शांत करत होतो. यावेळी माझा व्हिडीओ करण्याचा प्रयत्न झाल्यामुळे मला राग अनावर झाला. त्यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वी शिमग्याची पालखीवरून वाद झाला होता. आता देवीची ओटी भरून रुपे लावण्यावरून वाद आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष दिले असते तर हा प्रकार घडला नसता असे मी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या विषयात लक्ष घालून हा प्रकार मिटवण्याची जबाबदारी घेतली. दोन्ही बाजूने कोणतीही तक्रार नसल्यामुळे हा विषय तेथेच शांत झाला असताना निव्वळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून झाला आहे. 

"राजकारणात माझे हितचिंतक बरेच आहेत ते माझ्या विरोधात खोटे व्हिडीओ व्हायरल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यात माझ्या तुरंबव गावचा कोणी नाही. हा व्हिडीओ सावर्डेतून व्हायरल झाला आहे." 

- भास्कर जाधव, आमदार गुहागर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT