दरम्यान एसटी गणपती आणि कोकणचे चाकरमानी यांचे एक वेगळे नाते आहे. एसटी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू होतात.
सावंतवाडी - महाराष्ट्रातील प्रत्येक भागात मोठ्या आनंदाने गणेशोत्सव (ganesh festival) साजरा केला जातो. अगदी छोट्या छोट्या गावांपासून ते शहरांमध्ये मोठ्या आणि आकर्षक गणेशमुर्त्या अनेकांचे लक्ष वेधून घेतात. कोकणी माणूस (konkan People) आणि गणेशोत्सव असे एक वेगळे समीकरण आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक चाकरमाणी मुंबई, पुणे, ठाणेतून गणेशोत्सवासाठी आपाल्या गावी कोकणात येतात. यंदा चाकरमान्यांसाठी आमदर नितेश राणे (nitesh rane) यांनी एक मोठी घोषणा केली आहे. याची माहिती त्यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. (konkan Update)
ते म्हणतात, गणेशोत्सवासाठी दरवर्षी एसटी सोडण्यात येतात. पंतप्रधान मोदी यांनी नारायण राणे यांना केंद्रात स्थान दिले आहे. त्यामुळे यंदा चाकरमान्यांसाठी एसटी ऐवजी एक विषेश रेल्वे सोडण्यात येणार आहे. याचे नाव मोदी एक्सप्रेस (modi express) असे असणार आहे. सिंधुदुर्गासह कोकणातील कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी येथे ही रेल्वे चाकरमान्यांना (chakarmani) घेऊन जाणार आहे. दादर प्लॅटफॉर्म ८ वरून ही रेल्वे सुटणार असून प्रवासा दरम्यान कोकणवासीयांना एक वेळच्या जेवणाची सुविधा दिली जाणार आहे. या रेल्वेमध्ये अठराशे नागरिकांची आसन क्षमता आहे. यामुळे प्रवासासाठी संबंधितांनी संपर्क करण्याचा करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे. 27 ऑगस्टपर्यंत जागा रिझर्व करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान एसटी गणपती आणि कोकणचे चाकरमानी यांचे एक वेगळे नाते आहे. एसटी गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांच्या सेवेत रुजू होतात. गेली दोन वर्ष कोरोनामुळे वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र यंदा या बसेस धावणार आहेत, त्याचे ऍडव्हान्स बुकिंगही झाले आहे. मात्र सध्या आमदार नितेश राणे यांनी कोकणवासीयांसाठी ही महत्त्वाची घोषणा केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.