बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट sakal
कोकण

वन्यप्राण्यांचे मानवाशी वैर : बिबट्याकडून सर्वाधिक नुकसान; २ कोटींची भरपाई

संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील काही भागांमध्ये गवारेड्यांकडून शेतीचे नुकसान होते.

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील काही भागांमध्ये गवारेड्यांकडून शेतीचे नुकसान होते.

रत्नागिरी : वन्यप्राण्यांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार १६२ जणांचे नुकसान झाले असून, त्यांना भरपाईपोटी आतापर्यंत वनविभागाकडून १ कोटी ९५ लाख १ हजार ६१६ रुपये वितरित करण्यात आले. तीन वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्याचे २९ प्रकार घडले असून, २०१९-२० मध्ये सर्वाधिक १८ प्रकारांचा समावेश आहे. त्यात बिबट्याकडून मनुष्यावरील हल्ल्याच्या घटना सर्वाधिक आहेत.

संगमेश्‍वर, लांजा तालुक्यातील काही भागांमध्ये गवारेड्यांकडून शेतीचे नुकसान होते. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील शेती सोडली. शेतपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यां‍ना हातभार लावण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाते. रानडुक्कर, हरिण, (सारंग व कुरंग), रानगवा, निलगाय, माकड, वानर, वन्यहत्ती, बिबटे या वन्यप्राण्यांपासून मनुष्य, पशुधन, शेतपिकाला किंवा फळबागांना नुकसान झाल्यास नुकसानभरपाई दिली जाते. या मदतीसाठी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. पशुहानीची १ हजार ३७५ प्रकरणे घडली. त्या लाभार्थी शेतकऱ्‍यांना १ कोटी २५ लाख ९२ हजार १७७ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. शेतपिकांचीही वन्यप्राण्यांकडून नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत ७५८ लाभार्थ्यांना ५१ लाख ५४ हजार २७६ रुपये मदत दिली गेली.

मागील तीन वर्षांत जिल्ह्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात(animal attack) जखमी झाल्याचे २९ प्रकार घडले. त्यातील लाभार्थींना १७ लाख ५५ हजार १६३ रुपये मदत दिली गेली. यामध्ये सर्वाधिक प्रकरणे ही बिबट्याच्या(leopard attack) हल्ल्यात जखमींची आहेत. २०१८-१९ वर्षात १ लाभार्थ्याला १ लाख ४५ हजार, २०१९-२० मध्ये १८ लाभार्थ्यांना ७ लाख ९५ हजार, २०२०-२१ मध्ये १० लाभार्थ्यांना ५ लाख ९० हजार १६३ दिले, तर एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ अखेर एका लाभार्थ्याला १ लाख २५ हजार मंजूर आहेत.

भरपाई अशी :

  1. २०१८-१९ वर्षात : १ लाख ४५ हजार

  2. २०१९-२० मध्ये : ७ लाख ९५ हजार

  3. २०२०-२१ मध्ये : ५ लाख ९० हजार १६३

  4. एप्रिल २०२१- जानेवारी २०२२ अखेर : १ लाख २५ हजार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT