Minister Ravindra Chavan  esakal
कोकण

'सिंधुदुर्ग किल्ल्याची शिवरायांनी जिथे स्वतःच्या हस्ते पायाभरणी केली, ते ठिकाण आता पर्यटनस्थळ बनणार'

सिंधुदुर्ग जिल्हा व येथील गड-किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे. येथे पर्यटनाला मोठी संधी आहे.

सकाळ डिजिटल टीम

किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वतःच्या हस्ते पायाभरणी केली, ते इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे मोरयाचा धोंडा हे स्थळ येथील स्थानिक नागरिकांनी जपून ठेवले आहे.

मालवण : सिंधुदुर्ग किल्ल्याची (Sindhudurg Fort) छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) जेथे पायाभरणी केली, त्या ''मोरयाचा धोंडा'' (Moryacha Dhonda) या ठिकाणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार असल्याची घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी येथे केली.

''जय भवानी, जय शिवाजी'', ''छत्रपती शिवाजी महाराज की जय''च्या जयघोषात आणि शिवकालीन इतिहासाचा जागर करत मोरयाचा धोंडा या ऐतिहासिक स्थळाच्या ३५९ व्या वर्धापनदिनी पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली.

किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करताना शिवरायांनी ज्या ठिकाणी स्वतःच्या हस्ते पायाभरणी केली, ते इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण असे मोरयाचा धोंडा हे स्थळ येथील स्थानिक नागरिकांनी जपून ठेवले आहे. अशा ऐतिहासिक स्थळांच्या विकासासाठी आवश्यक व्यवस्था सरकारने निर्माण केली पाहिजे. याच विचारातून आणि मोरयाचा धोंडा स्थळाचे महत्त्व पुढील पिढीलाही कळावे, या दृष्टीने नौदल, शासन व पर्यटन विभाग यांच्या विद्यमाने विकास करून पर्यटनस्थळ निर्माण करण्याची संकल्पना राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘सिंधुदुर्ग जिल्हा व येथील गड-किल्ल्यांचे महत्त्व मोठे आहे. येथे पर्यटनाला मोठी संधी आहे. त्यासाठी किल्ल्यांची डागडुजी व त्यांच्या बाजूला सुविधा सरकारने निर्माण करणे गरजेचे आहे. इतिहास काळापासून असलेल्या या वास्तूंचा वारसा व प्रथा, परंपरा शासकीय पद्धतीने जोपासल्या गेल्या पाहिजेत व पुढेही तशाच सुरू राहिल्या पाहिजेत. मोरयाचा धोंडा स्थळाचे महत्त्व लक्षात घेऊनच त्याचा विकास करण्यात येणार आहे. यापूर्वी असे का झाले नाही? अनेक गोष्टी लाल फितीत अडकल्या; मात्र आज अधिकारी तत्परतेने काम करीत आहेत. कारण राज्यातील सरकार अधिकाऱ्‍यांच्या पाठीशी आहे.

रायगड किल्ल्याप्रमाणेच सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात होणाऱ्‍या दैनंदिन पूजेला देखील शासनाकडून व्यवस्था निर्माण करून दिली पाहिजे. मालवणात ४ डिसेंबरला नौदल दिन साजरा होत असून, या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. आपल्या देशाच्या किनारपट्टीचे रक्षण करणाऱ्या‍ नौदलाचे आभार मानण्यासाठी सज्ज होऊया.’

या वेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, किल्ले सिंधुदुर्गचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर यांचे तेरावे वंशज श्रीनिवास इंदुलकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, देवदत्त सामंत, बाबा मोंडकर, अशोक सावंत, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, अशोक तोडणकर, संतोष लुडबे आदी उपस्थित होते.

या वेळी माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, किल्ले सिंधुदुर्गचे स्थापत्यकार हिरोजी इंदुलकर यांचे तेरावे वंशज श्रीनिवास इंदुलकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, देवदत्त सामंत, बाबा मोंडकर, अशोक सावंत, तहसीलदार वर्षा झालटे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, विजय केनवडेकर, गणेश कुशे, आपा लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, अशोक तोडणकर, संतोष लुडबे आदी उपस्थित होते.

तसेच रमाकांत धुरी, नारायण तोडणकर, संजीव धुरी या स्थानिक ग्रामस्थांसह पुरोहित विलास अभ्यंकर व मोरयाचा धोंडा स्थळाचा विकास आराखडा बनविणारे मंगेश दळवी यांचा पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वायरी-दांडी ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. बाबा मोंडकर यांनीही विचार मांडले. भाऊ सामंत यांनी शिवप्रार्थना सादर केली. सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी केले.

इतर किल्ल्यांचाही कायापालट व्हावा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच इतर छोटे किल्ले सिंधुदुर्गच्या रक्षणासाठी बांधले. पालकमंत्री चव्हाण यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच सर्जेकोट, पद्मगड या किल्ल्यांचीही दुरुस्ती करावी, असे आवाहन यावेळी नीलेश राणे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT