साडवली (रत्नागिरी) : जन्मदात्या आईच्या शेवटच्या क्षणी हजर रहाता आले नाही,मनावर दगड ठेवुन तीचे अंत्यदर्शन व्हिडीओकाॅलींग द्वारे घ्यावे लागले यालाच नियती म्हणतात ही घटना देवरुख मधील सौ.अमिषा आनंद बारटक्के यांच्या बाबतीत घडली.सौ.अमिषा यांच्या मातोश्री श्रीमती.अंजली मधुकर मिरजकर यांचे हदयविकाराच्या धक्याने निधन झाले.त्या कोल्हापुरला राजारामपुरी तिसर्या गल्लीत रहात होत्या.घरी दोन मुलगे होते.दोन बहिणींना ही घटना कळताच त्यांनाही तीव्र धक्का बसला.लाॅकडाऊन असल्याने सौ.अमिषा यांना कोल्हापुरला जाता आले नाही .दुसरी बहिणही परगावी असल्याने तीलाही येता आले नाही.
मिरजकर कुटुंबियांनी याही परीस्थितीत व्हिडीओ काॅलींग करुन बहीणींना आईचे अंतीम दर्शन घडवले.रक्ताची नाती असुनही मुलींना आईला शेवटचे भेटता आले नाही.ज्या माउलीने मुलींना घडवले,संसारात स्वतःच्या पावलावर उभे राहायला शिकवले त्याच माउलीची शेवटची भेटही या दोघी बहीणींना घेता आली नाही ही खरेच शोकांतिका म्हणावी लागेल.
देवरुख ते कोल्हापुर हे अवघे १०० की.मी. चे अंतर कोरोनामुळे पार करता आले नाही व आईला शेवटची आई ही हाकही मारता आली नाही हे शल्य अमिषा बारटक्के यांना कायम बोचत राहणार आहे. आणि असा प्रसंग शञुवरही येवु नये अशी अपेक्षाही सौ.बारटक्के मनाशी बाळगुन आहेत.जावई आनंद उर्फ नंदु बाटक्के व नातु या प्रसंगातुन अजुनही सावरलेले नसुन अमिषा यांना धीर देण्यातच पती व मुलगे यांना सामोरे जावे लागत आहे.
ही घटना सौ.अमिषा बारटक्के कधीही विसरु शकणार नाहीत असा प्रसंग त्यांच्यावर ओढवला आहे. सर्व बारटक्के कुटुंबिय या घटनेमुळे हादरुन गेले आहे.कुणी कुणाचे सांत्वन करायचे अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.लाॅकडाउन असल्याने दिवसकार्यालाही उपस्थित रहाता येणार नाही याही प्रसंगाला बारटक्के यांना सामोरे जावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.