MSEDCL's arrears at Sindhudurg over 60 crores 
कोकण

सिंधुदुर्गात "महावितरण'ची थकबाकी ६० कोटींवर 

रूपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - कोरोना संकटाचा फटका जिल्ह्यातील महावितरणला मोठ्या प्रमाणात बसला आहे. लॉकडाउन काळापासून आत्तापर्यंत जिल्ह्याच्या दहा उपविभागांचा एकूण थकबाकीचा आकडा 60 कोटींच्यावर पोहोचला आहे. घरगुती, व्यवसायिक, औद्योगिक, कृषीपंप, स्ट्रीट लाईट, नळयोजना व इतर सर्व प्रकारांमधील ही थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करणे महावितरणसमोर एक आव्हान आहे. 

कोरोनामुळे अनेक धंदे, व्यवसाय बंद पडून अनेकांचे रोजगार हिरावले गेले. बेरोजगार होऊन घरी बसावे लागले तर कर्जांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे हातात पैसा नसल्याने आर्थिक व्यवहार मंदावले गेले. जिल्ह्याच्या महावितरण विभागाला थकबाकीमुळे खूप मोठ्या आर्थिक संकटाचे तोंड पहावे लागत आहे. 60 कोटी 52 लाख रुपयांची थकबाकी वीज ग्राहकांकडे पडून राहिली आहे. 

लॉकडाउन काळात जनतेसमोर राहिलेले आर्थिक संकट लक्षात घेता शासनाकडून वीज वसुलीबाबत ग्राहकांना कुठल्या प्रकारचा त्रास न देण्याचे, वसुलीसाठी तगादा न लावण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवाय महावितरणकडून जून ते ऑगस्ट या तीन महिन्याची बिले कुठल्याही प्रकारचे मिटर रिडींग न घेता सरासरी आकारमानानुसार एकाच वेळी काढण्यात आली होती. यामुळे ग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करताना वीज बिल न भरण्याचा इशारा देण्यात आला होता.

एकूणच सरासरी काढण्यात आलेल्या वीज बिलावरून संपूर्ण जिल्ह्यामध्ये विज ग्राहकांमध्ये असंतोष होता. राजकीय पदाधिकाऱ्यांनी सुद्धा ही वीजबिले सर्वसामान्यांवर अन्यायकारक असल्याचे सांगून हे वीज बिले शासनाने माफ करावी, अशी मागणी रेटून धरली होती; मात्र शासनाकडून वीज ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा देताना तीन महिन्याची एकूण वीज बिलाची रक्कम तीन टप्प्यांमध्ये भरण्याची सवलत दिली होती; मात्र असे असतानाही विज बिल भरण्यासाठी ग्राहकांनी पाठ फिरवली. परिणामी थकबाकीचा आकडा 60 कोटींच्यावर जाऊन पोहचला. 

घरगुती वीज ग्राहकांबरोबरच व्यावसायिक व औद्योगिक वीज ग्राहकांसमोरही आर्थिक प्रश्‍न उभा राहिल्याने व्यावसायिक व औद्योगिक वीज बिलांची थकबाकी ही मोठी आहे. व्यापारी बांधवांनीही वीज बिलामध्ये शासनाकडून सुट देण्यात यावी, अशी मागणी केली; मात्र विज बिलांबाबत शासनाकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा आदेश आला नसल्याने वीज बिलाची रक्कम संबंधितांना भरणे भाग आहे. 

घरगुती बिलांची सर्वाधिक थकबाकी 
जिल्ह्यातील थकबाकीचा आकडा लक्षात घेता, घरगुती विज बिल 29 कोटी 26 लाख, व्यावसायिक वीज बिल 10 कोटी 37 लाख, औद्योगिक विज बिल 4 कोटी 79 लाख, कृषी पंप 55 लाख, स्ट्रीट लाईट 10 कोटी 99 लाख, नळयोजना 3 कोटी 27 लाख, शाळा महाविद्यालये एक कोटी 19 लाख तर इतर विज बिलामध्ये 63 लाख रुपये थकबाकी आहे. 

जिल्ह्यातील वीज ग्राहकांना जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातील एकूण वीज बिलाची रक्कम पुढील तीन महिन्यापर्यंत तीन टप्प्यात भरण्याची सूट दिली होती; मात्र आता ही सुट निघून गेल्याने थकबाकीदार ग्राहकांना त्यांच्या वीज बिलाच्या रकमेवर चार्ज लागणार आहे. शिवाय मागचे बिल पुढील बिलामध्ये सामावून येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी बिले भरून सहकार्य करावे. थकबाकीचा आकडा वाढला असला तरी जिल्ह्यातील वीज यंत्रणेवर कुठलाही परिणाम झालेला नाही. 
- विनोद पाटील, अधीक्षक अभियंता, सिंधुदुर्ग महावितरण 
 

उपविभाग निहाय विज ग्राहकांची रु. 300/- वरील दि.22.10.2020 रोजी असलेली एकूण थकबाकी (रू. लाखात) 
उपविभागाचे नाव*थकबाकी ग्राहक संख्या*रक्‍कम 

आचरा*6275*344.93 
देवगड*10908*557.25 
कणकवली*17612*1096.18 
मालवण*9074*587.39 
वैभववाडी*7962*473.77 
कुडाळ*15011*869.22 
ओरोस*6372*281.98 
दोडामार्ग*6138*354.35 
सावंतवाडी*15432*873.94 
वेंगुर्ला*12046*613.94 
सिंधुदुर्ग मंडळ एकूण*106830*6052.95 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT