मंडणगड (रत्नागिरी) : माझी रत्नागिरी माझी जबाबदारी (My Ratnagiri is my responsibility)मोहिमेंतर्गत मंडणगड (Mandangad)तालुक्यातील गावोगावी ४५ हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी लक्षणे आढळलेल्या ६० व्यक्तींची अँटिजेंन व आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी १५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याची माहिती मंडणगड गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवें (Group Development Officer Hemant Bhingardev)यांनी दिली. सर्व नागरिकांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या असून वेळीच चाचणी करून उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात आले.
My Ratnagiri is my responsibility Survey Complete of 45 000 persons in Mandangad taluka Ratnagiri marathi news
मंडणगडच्या सर्व गावांतून ता.३ मे २०२१ ते १५ मे २०२१ दरम्यान माझी रत्नागिरी माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली. ग्रामसेवक, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची ८६ पथके कार्यरत करण्यात आली होती. गावोगावी प्रत्येक घरी जावून सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने 6 min walk test करून spo2 लेवल तपासणे, थर्मल गण द्वारे temp तपासणे हे समाविष्ट होते. तसेच सर्दी, ताप, खोकला, वास न येणे, चव नसणे, दम लागणे इ. लक्षणे असलेल्या व्यक्ती ओळखणे व संशयित व्यक्तीची antigen test अथवा rt-pcr टेस्ट करणे याचा समावेश होता.
संपूर्ण सर्वेक्षणात सुमारे 150 संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी 60 व्यक्तीची antigen/rt-pcr करण्यात आली. पैकी 15 व्यक्ती positive आढळल्या. अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती करणे हा होता. त्यासाठी प्रत्येक कुटुंबामध्ये माहिती पत्रक देण्यात आले. ज्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी गृहविलगीकरण्याच्या सूचना, गृह विलगीकरनात असलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा पाठपुरावा करताना धोक्याच्या घंटा यावर विशेष लक्ष देणे. जसे की ऑक्सिजन पातळी 95 च्याखाली येणे, होम आईसोल्युशन किटमध्ये कोणती औषधे घेण्यात यावीत, त्याची माहिती, गृह विलगीकरण कधीपर्यंत करावे याची माहिती, कोवीड होऊन गेलेल्या व्यक्तींना सूचना, कोविड न झालेल्या व्यक्तींसाठी सूचना, पोषण बद्दल मार्गदर्शक सूचना इ. माहिती देण्यात आली. अभियानाचे नियोजन व मॉनिटरिंग गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवें यांनी केले.
गटविकास अधिकारीही उतरले सर्वेक्षणात
तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण करण्यासाठी ८६ पथके कार्यरत करण्यात आली. सर्व शासकीय कर्मचारी यासाठी मेहनत घेत होते. यादरम्यान मंडणगड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदेवें या मोहिमेचे नेतृत्व करीत होते. त्याचबरोबर त्यांनी स्वतः बाणकोट येथे जावून प्रत्यक्ष सर्वेक्षणात सहभाग घेतला. अनेक नागरिकांची तपासणी करून त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मार्गदर्शक सूचना केल्या.
अभियान यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक, शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सरपंच, ग्रामकृती दल यांच्यासह मंडणगडवासियांनी या अभियानात सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही धन्यवाद.
- हेमंत भिंगारदेवें, गटविकास अधिकारी मंडणगड.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.