NCP-Shivsena Esakal
कोकण

Political News: बंडखोरी महाआघाडीसाठी धोक्याची घंटा

मंडणगड न. पं.; नाकारलेल्यांचे पाय धरण्याची वेळ, ऐनवेळी केलेल्या आघाडीने फटका

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : राष्ट्रवादी - शिवसेनेने (NCP,Shivsena) मंडणगडात महाआघाडी केली. पण दोन्ही पक्षांत बंडखोरी झाली. बंडखोरीमुळे महाआघाडीचा प्रयोग फसला. विद्यमान आमदारांच्या बंडखोर गटावर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादीला आपल्या पक्षातील तिकीट नाकारलेल्या उमेदवारांचे पाय धरण्याची वेळ आली आहे.

पक्षाचे इच्छुक दोन जागांवर अपक्ष म्हणून निवडून आले तर एका प्रभागातील मैत्रीपूर्ण लढत महाआघाडीच्या अंगाशी आली. शिवसेनेचाच विद्यमान आमदार गट शहरविकास आघाडी घेऊन उतरल्याने महाआघाडीतील शिवसेना मित्रपक्षाने लढवलेल्या चारही जागांवरील त्यांचे उमेदवार पराभूत झाले. राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे ७ उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून आले. सातही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज ८२८ इतकी आहे.

राष्ट्रवादीशी संबंधित असलेल्या तीन नगरसेवकांना २१८ इतकी मते मिळाली आहेत. एकत्रित १०४६ इतकी मते होतात. ही आकडेवारी ४५ टक्क्यांच्या जवळ जाणारी आहे. आपल्या पांरपरिक मतदान सरासरी जवळपास जाण्यात हा पक्ष यशस्वी झाला. नगरसेवकांचे संख्याबळ २ इतक्या संख्येने कमी झाले आहे. पाच वर्षे एकहाती सत्ता राबवून साकारलेल्या विकासकामांच्या बळावर सत्ता मागणे अपेक्षित असताना बदलेले प्रचाराचे मुद्दे, मागे पडलेला विकासाचा मुद्दा व ऐनवेळी केलेल्या आघाडीने फटका बसला असून राष्ट्रवादीस दीर्घकाळ याचे परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे.

स्थानिक नेते अपयशी

निवडणुकांच्या तोंडावर येथील मतदारांना विकास सोडून अन्य मुद्यावर प्रभावित करण्याचे तंत्र मतदाराना संभ्रमित करून गेले, असा निष्कर्ष निकालानंतर निघाला आहे. यातून तडजोडी कराव्या लागत आहेत. राज्याचे सत्ताकारण लक्षात घेऊन आगामी सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी घेतला खरा, मात्र या निर्णयाची आवश्यकता मतदारांना समाजावून सांगण्यास स्थानिक नेतृत्व कमी पडले. दीर्घकालीन राजकारणाचा विचार करता, दोन्ही पक्षासांठी ती धोक्याची घंटा ठरेल.

एक नजर..

राष्ट्रवादीच्या सातही उमेदवारांच्या मतदानाची बेरीजः ८२८

राष्ट्रवादीशी संबंधित तीन नगरसेवकांना मतेः २१८

एकत्रित मते होतातः १०४६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT