राजापूर : 'नाणार हा विषय आता संपला असून जिथे जागा उपलब्ध होईल तिथे प्रकल्प उभारणीला पाठिंबा' अशी शिवसेना पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे राजापूर शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जिथे जागा उपलब्ध होईल तिथे रिफायनरी प्रकल्प उभारणीला आपला पाठिंबा आहे. या भूमिकेतून आपण रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणार्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे आपली कोणतीही पक्षविरोधी भूमिका नाही. अशी प्रतिक्रीया शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी दिली आहे.
एका बाजूला स्वतः प्रकल्प समर्थनाची भूमिका घ्यायची आणि दुसर्या बाजूला समर्थन केले म्हणून आमच्यावर कारवाईची भाषा बोलायची अशी आमदार राजन साळवींची दुटप्पी भूमिका का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आपण रिफायनरी समर्थनाची भूमिका घेतल्याने हकालपट्टी केली जात असेल तर, शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या अनेक ग्रामपंचायतींनीही प्रकल्प समर्थनाचे ठराव केले आहेत. त्या सर्वांची पक्षाकडून हकालपट्टी केली जाणार का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. केवळ अशा कारवाया करण्यापेक्षा कार्यकर्त्यांची सभा घेवून त्यांची थेट रिफायनरीसंबंधित मते पक्षनेतृत्वाने आजमावित. त्यामध्ये मत मांडण्यासाठी कोणतेही दडपण आणू नये असे मतही त्यांनी यावेळी मांडले.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "कोरोना महामारीमध्ये उपलब्ध आरोग्य सुविधांच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. मात्र, रिफायनरी प्रकल्प झाल्यास आरोग्य सुविधा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. कोट्यावधी रूपयांची गुंतवणूक असलेल्या रिफायनरी प्रकल्पामुळे राजापूर तालुक्याचाच नव्हे तर, संपूर्ण कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध होताना अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यातून, बेरोजगारी दूर होण्याला एकप्रकारे मदत होणार आहे. हा संभाव्य विकासात्मक कायापालट डोळ्यासमोर ठेवून आपण रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले आहे. हे समर्थन आताचेच नसून विकासाचे समर्थन करणारे यापूर्वीपासूनचे आहे."
रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करणारी भूमिका आपल्यासह सहकारी नगरसेविका मनिषा मराठे यांनीही मांडली आहे. मात्र, माझी भूमिका पक्षविरोधी ठरवून आपल्यावर हकालपट्टीची कारवाई केली जात असेल तर, मराठे यांना केवळ तोंडी सूचना देवून एकप्रकारे अभय दिले जात आहे. त्यामधून कारवाईबाबतची पक्षाची अशी दुटप्पी भूमिका दिसत असून हिच का बाळासाहेबांची शिवसेना ? असा सवालही प्रतिक्षा खडपे यांनी उपस्थित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.