कोकण

‘रिफायनरी’ बाहेर गेल्‍यास खासदारांना माफी नाही'

सकाळ डिजिटल टीम

कणकवली : शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार येथे रिफायनरी प्रकल्‍प होणार नाही. तर रत्‍नागिरीतील बारसू-सोलगाव येथे प्रकल्‍प होण्यासाठी चाचपणी केली जात आहे. मात्र तेथेही प्रकल्‍प न झाल्‍यास जनता खासदारांना माफ करणार नाही आणि पुन्हा निवडूनही आणणार नाही असा इशारा भाजपचे प्रदेश चिटणीस आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला.

जठार म्‍हणाले, सिंधुदुर्गातील दोन आणि रत्‍नागिरीतील बारा अशा चौदा गावांमध्ये रिफायनरी प्रकल्‍प प्रस्तावित झाला होता. येथे प्रकल्‍प होण्यासाठी स्थानिक जमीन मालक आणि शेतकऱ्यांनी शासनाकडे संमतीपत्रे दिली होती. मात्र खासदार विनायक राऊत यांच्यासह तेथील शिवसेना नेत्‍यांनी या प्रकल्‍पाला विरोध कायम ठेवला. आता तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्‍याचे मुख्यमंत्री असल्‍याने नाणार येथील रिफायनरी प्रकल्‍प रद्द झाल्‍यात जमा आहे. त्‍यामुळे कंपनीने राजापूर तालुक्‍यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणच्या प्रकल्‍प होण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. त्‍याअनुषंगाने सोलगाव, बारसू याठिकाणी २३०० एकरसाठी अधिसूचना काढण्यात आली आहे.

सध्या त्‍या परिसरात ११ हजार ५०० एकर जमिनीची उपलब्‍धता आहे. या क्षेत्रात एकही गाव अथवा वाडी विस्थापित होत नाही. त्‍यामुळे येथे प्रकल्‍पाबाबत अजून विरोधाची भूमिका नाही. मात्र येथील बहुतांश ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्‍यात आहे. त्‍यामुळे या भागातही रिफायनरीला विरोध झाला तर महाराष्‍ट्रातून रिफायनरी प्रकल्‍प बाहेर जाणार आहे. तसे झाल्‍यास रोजगाराच्या लाखो संधी वाया जाणार आहेत. तसेच रत्‍नागिरी आणि सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेसही फटका बसणार आहे. त्‍यामुळे रिफायनरीला विरोध करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना जनता कदापि माफ करणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधींची प. महाराष्ट्रात राजकीय मशागत; सांगलीनंतर एकाच महिन्यात कोल्हापूर दौरा, नेमकं काय घडणार?

'सारं काही तिच्यासाठी' फेम खुशबू तावडे दुसऱ्यांदा झाली आई; दिला गोंडस बाळाला जन्म; मुलगा की मुलगी?

Assembly Elections 2024 : तुमचं बर हाय, आमची फरपट कवा थांबणार? भोकर मतदारसंघात भावी आमदारांची गर्दी, मूलभूत गरजांची वाणवा

Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Elon Musk: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आर्थिक संकटात; इलॉन मस्कला मोठे नुकसान, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT