narayan rane sakal
कोकण

देवगडात नरेंद्र मोदी, राणे, फडणवीसांचा 'कटाआऊट' लक्षवेधी

संतोष कुळकर्णी

देवगड (सिंधुदुर्ग) : भाजपच्या जन आशिर्वाद यात्रेचे तालुक्यात उत्साहात स्वागत झाले. रस्त्यालगत लावलेले स्वागत फलक, झेंडे, रस्त्यावर रेखाटली रांगोळी, ढोल ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा जयघोष अशा उत्साही वातावरणात केंद्रीय मंत्री झाल्यावर तालुका दौऱ्यावर प्रथमच आलेल्या नारायण राणे यांचे स्वागत झाले. त्यांच्या सोबत विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार आशिष शेलार, माजी आमदार आणि यात्रा कार्यक्रम संयोजक प्रमोद जठार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होती.

तालुक्यात शिरगापासूनच जन आशिर्वाद यात्रेचे स्वागत झाले. तेथून तळेबाजार, जामसंडे, देवगड आणि कुणकेश्वर मार्गे मालवण असा प्रवास होता. जामसंडे येथे स्वागत मंच उभारण्यात आला होता. याठिकाणी नारायण राणे यांच्यासह नेतेमंडळीनी स्वागत स्विकारले. या भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, नागरिक जमले होते. रस्त्यावर सर्वत्र स्वागत फलक, झेंडे लावण्यात आले होते. तसेच देवगडमध्येही स्वागत मंच उभारण्यात आला होता. तेथील पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कटाआऊट लक्षवेधी ठरले.

स्वागतासाठी अनेकजण आतुर होते. राणे यांचे तालुक्यात आगमन होताच उत्साहाला उधाण आले. यावेळी मोठा पोलीस फोजफाटा तैनात होता. शिरगाव, तळेबाजार परिसरात स्वागत स्विकारल्यानंतर जामसंडे येथे उत्साही स्वागत झाले. कार्यकर्त्यांच्या जयघोषाने परिसर दणाणला. विविध संस्था, संघटना यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

जन आशिर्वाद यात्रेमुळे देवगडला येणे झाले. जनतेचा आशिर्वाद महत्त्वाचा आहे. गरीबाला धान्य आणि अशा अनेक पंचवीस योजना पंतप्रधानांनी दिल्या.

नारायण राणे ,केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT