NCP esakal
कोकण

'पालिकेत राष्ट्रवादीला सत्ता मिळाल्यास बारामतीसारखा विकास करु'

मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक जागा न दिल्यास सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार

सकाळ डिजिटल टीम

मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक जागा न दिल्यास सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार

सावंतवाडी : येथील पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मित्रपक्षांनी सन्मानपूर्वक जागा न दिल्यास सर्वच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी उमेदवार देणार आहे; मात्र राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच सर्व निर्णय घेतले जाणार आहेत. आमची लढाई कोणा एका पक्षाविरोधात नसेल तर ते वैचारिक पद्धतीची असणार असे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांनी सांगितले. (Konkan News)

फुटपाथवर आठवडा बाजार भरून सत्ताधाऱ्यांनी मोती तलावाला दिलेले झोपडपट्टीचे स्वरूप हेच सावंतवाडीचे पर्यटन का? असा सवालही श्री. दळवी यांनी उपस्थित करून काही सत्ताधारी सोशल मीडियावर (Social media) मोती तलावात कमळ फुलल्ल्याचे फोटो व्हायरल करतात; मात्र कमळ कुठे फुलते? हे त्यांना ज्ञात नाही का? असा टोलाही लगावला. दळवी यांनी येथील राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. (Political News)

यावेळी दळवी पुढे म्हणाले, "या ठिकाणी महाविकास आघाडी करुन निवडणूक लढविल्या जातील अशी अपेक्षा आहे; परंतु आयत्यावेळी जागा वाटपात योग्य सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढविण्यास तयार आहोत. त्या दृष्टीने आमची चाचपणी सुरू आहे. आमच्याकडे निवडणुकीला सामोरे जातांना सत्ताधार्‍यांच्या विरोधात अनेक मुद्दे आहेत; मात्र आम्ही वैचारीक दृष्टीने विकासाच्या जोरावर लोकांसमोर जाणार आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादीला सत्ता मिळाल्यास सावंतवाडीचा बारामतीसारखा विकास करुन दाखवू."

ते पुढे म्हणाले, "आज सावंतवाडी (Savantwadi) शहरामध्ये अति तलावाच्या फुटपाथवर सत्ताधार्‍यांकडून आठवडा बाजार भरविला जात आहे. यामुळे वृद्ध पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते हे चुकीचे असून तलावाला झोपडपट्ट्यांची स्वरूप आले आहे. नागरिकांना सोयीस्कर व्हावा, अशा ठिकाणी हा आठवडा बाजार बनवणे गरजेचे होते. शहरातील गांधी चौक परिसरामध्ये आठवडा बाजारबरोबर याचा विचार होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने योग्य नियोजन केल्यास त्यामध्ये सत्ताधारी यशस्वीही झाले असते. आज तलावाकाठी भरणाऱ्या बाजारांमध्ये गटारांमध्ये उभे राहून तसेच रस्त्यावर गाड्या उभ्या करून भाजी खरेदी केली जाते. याबाबत विचार होणे गरजेचे आहे. सत्ताधाऱ्यांना पादचारी मार्गाचा अर्थच समजला नसल्याने त्यांनी आठवडा बाजारासाठी फुटपाथवरची जागा योग्य समजली असावी."

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर, जिल्हा उपाध्यक्ष शफिक खान, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग-व्यापार हिदयातुल्ला खान, महिला जिल्हाध्यक्ष उद्योग-व्यापार सौ. दर्शना बाबर देसाई, राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, माजी नगरसेविका सौ. अफरोज राजगुरू, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, युवती तालुकाध्यक्ष जहिरा ख्वाजा, महिला शहराध्यक्ष सौ. रंजना निर्मळ, अल्पसंख्यांक सरचिटणीस, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू, असिफ ख्वाजा, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, तालुका सदस्य संतोष जोईल, अर्शद बेग आदी उपस्थित होते.

शरद पवारांचा वाढदिवस साजरा करणार

१२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी १० ला वक्ता प्रशिक्षण होणार असून यासाठी प्रदेश वरून वक्ते येणार आहेत. १२ ला आपल्या समर्थ कृपा निवास येथील हॉलवर ऑनलाईन पद्धतीने शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होणार असून पवार हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी पुंडलीक दळवी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT