NCP- Sharad Chandra Pawar party leader Amit Saraiya filed candidature konkan padvidhar matdar sangh  
कोकण

Konkan Graduate Constituency Election : कोकण पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमीत सरैया रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. ७ : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षदेखील उतरला आहे. आज अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक अमीत सरैया यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेस त्यांनी, विजयाचा विश्वास व्यक्त केला.

कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीवरून महायुतीमध्ये बेबनाव झाला आहे.  शिवसेनेचे संजय मोरे आणि विद्यमान आमदार निरंजन डावखरे हे निवडणूक रिंगणात उतरले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अमीत सरैय्या यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अमीत सरैय्या यांनी गेल्या वर्षभरात सुमारे हजारो मतदारांची नोंदणी केली आहे. या मतदारासंख्येसह महायुतीमध्ये फूट पडल्याचा फायदा सरैय्या यांना मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी अमीत सरैया यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले,  गेले सहा महिने आम्ही मोठ्या संख्येने मतदार नोंदणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशिक्षित मतदारांनी भाजपला नाकारले आहे. सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यास प्राधान्यक्रम देऊन आपण काम करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की यंदा कोकण पदवीधर मतदारसंघात बदल होणार आहे.

मनसेच्या माघारीबाबत विचारले असता, मनसे हा संपलेला पक्ष आहे. सेटींग करणारा पक्ष म्हणून मनसेची ओळख आहे. त्यामुळे आपण त्यांना गांभीर्यपूर्वक घेत नाही. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ही निवडणूक जिंकणार असून त्यासाठी आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा अमीत सरैया म्हणून काम करीत आहे, असेही सरैया म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT