सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर आजची तरुण पिढी गुंतलेली दिसून येते. यात काहीजण या माध्यमांकडे केवळ मनोरंजन, एकमेकांची उणीदुणी काढणे यासह अन्य बाबींवर भाष्य करण्यातच धन्यता मानतात; परंतु या माध्यमांचा रोजगार मिळविण्यासाठीही प्रभावी 
कोकण

सोशल मीडियातून शोधल्या रोजगाराच्या नवनव्या संधी

कोकणातील तरुणांचा समस्येवर उपाय

सकाळ वृत्तसेवा

मालवण : सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर आजची तरुण पिढी गुंतलेली दिसून येते. यात काहीजण या माध्यमांकडे केवळ मनोरंजन, एकमेकांची उणीदुणी काढणे यासह अन्य बाबींवर भाष्य करण्यातच धन्यता मानतात; परंतु या माध्यमांचा रोजगार मिळविण्यासाठीही प्रभावी वापर होऊ शकतो, हे जाणून सिंधुदुर्गासह कोकणातील अनेक तरुणांनी युट्यूबच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या वाटा शोधल्या आहेत.

स्थानिक पर्यटन, गावची संस्कृती, निसर्ग, शाश्‍वत जीवनशैली, नवोद्योजकांना प्रोत्साहन, सण, उत्सव, दुर्लक्षित पर्यटनस्थळे, प्राचीन संस्कृती यासारख्या गोष्टी प्रकाशझोतात आणण्याचे काम या तरुणांनी केले आहे. यातूनच त्यांनी या माध्यमांचा चांगला वापर केल्यास त्यातून चांगले उत्पन्नही मिळू शकते, याचा धडा नव्या पिढीला दिला आहे. सोशल मीडिया हे प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे. यात प्रत्येकजण आपल्या मर्जीने, कल्पनेने, विचाराने या माध्यमांवर व्यक्त होत असतो. आपले आचार-विचार, आठवणी या माध्यमांवर शेअर करत असतो. सोशल मीडियावरील फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमांकडे युवा पिढीचाच नव्हे, तर वयोवृद्धांचाही मोठा कल असल्याचे दिसून येते. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. यावेळेस या माध्यमांचा वापर माहिती देण्यासाठी, जाणून घेण्यासाठी केला गेला. युट्यूब हे माध्यम प्रत्येक गोष्टीची माहिती व्यवस्थितरित्या समजून, उमजून घेण्यासाठी-देण्यासाठी योग्य असल्याचे जाणत अनेक तरुणांनी याचा प्रभावी वापर केला. यातूनच असंख्य युट्यूबर्स तयार झाले. या युट्यूबर्सनी लॉकडाऊन काळात लोकांचे मनोरंजन तर केलेच, शिवाय चांगली माहिती देत समाजोपयोगी गोष्टीही घडविल्या.

लॉकडाऊन काळात रोजगाराचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे अनेक तरुणांनी सोशल मीडियाकडे रोजगार देण्याचा एक पर्याय म्हणून पाहत त्याचा प्रभावी वापर केला. यात लकी ऊर्फ लक्ष्मीकांत कांबळी-मालवणी लाईफ (रेवंडी-मालवण), अनिकेत रासम-गोष्ट कोकणातली (हरकुळ-कणकवली), प्रगत लोके-ब्लॉगस् (मिठबाव-देवगड), संचित ठाकूर (मसुरे-मालवण), रिषभ तोडणकर (रत्नागिरी), कोकण संस्कृती (चिपळूण), एस फॉर सतीश (मंडणगड), कोकण कार्टी (गुहागर), कोकणी रानमाणूस यासारख्या चॅनेलची निर्मिती करत रोजगाराच्या नव्या वाटा शोधल्या. यात लकी यांनी नवोद्योजकांना प्रोत्साहन देण्याबरोबरच आपल्याकडील सण, उत्सवांची माहिती दिली. अनिकेत रासम यांनी गावातील जीवनशैली, ‘कोकणी रानमाणूस’मधून कोकणातील निसर्ग टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार, शाश्‍वत जीवनशैली, संचित ठाकूर यांनी पुरातन काळातील गुहा, दुर्लक्षित पर्यटनस्थळे, कोकणची संत परंपरा, कातळशिल्पे, प्रगत लोके यांनी विविध पर्यटनस्थळे यांची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्याचे काम केले आहे.

कॅलिफोर्निया ते सिंधुदुर्ग...

आतापर्यंत आपण केवळ ‘कोकणचे कॅलिफोर्निया करणार’ हे ऐकत आलो आहोत; मात्र कोकणची संस्कृती, पर्यटन, जीवनशैली, प्राचीन रहस्ये येथील तरुणांनी युट्यूबच्या माध्यमातून जगासमोर आणून आपली वेगळी छाप पाडण्याचे काम केले आहे. यातूनच एक लाखाचे सब्सक्रायबर बनलेल्या या तरुणांची युट्यूबने दखल घेत थेट कॅलिफोर्निया येथून सिंधुदुर्गातील युवा युट्यूबर्सना ‘सिल्व्हर प्ले बटण’ हे मानचिन्ह बहाल केले आहे.

दरम्यान, कुटुंबाचा उदरनिर्वाह यातून करू शकतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली. आपल्या भागातील चांगली माहिती देणारे व्हिडिओ बनवून ते युट्यूबवर अपलोड केल्यास त्यातून चांगले उत्पन्न तर मिळतेच; शिवाय त्या कामाची गोडी वाढते. आज फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब ही माध्यमे चांगला रोजगार देऊ शकतात; मात्र नव्या युट्यूबर्सनी चांगली, दर्जेदार माहितीचे व्हिडिओ, माहितीपट बनवायला हवेत. यात नियमितपणा असावा. शिवाय प्रचंड मेहनत घेण्याचीही तयारी असावी. युट्यूब चॅनेल बनविताना परिपूर्ण शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. रोजगाराची संधी म्हणून युट्यूबकडे पाहणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यास प्रयत्नशील आहोत, असे लकी यांनी सांगितले.

नवउद्योजकांना दिला व्यवसाय...

लॉकडाऊन काळात अनेक छोटे उद्योजक निर्माण झाले. या उद्योजकांनी उत्पादित केलेला माल, त्यांचा व्यवसाय जगासमोर यावा, यासाठी युवा युट्यूबर्संनी चांगले व्हिडिओ बनविले. या व्हिडिओंना सर्वांचा चांगला प्रतिसाद लाभला. या व्हिडिओंचा फायदा व्यावसायिकाला त्याने बनविलेला माल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविता आला. यातून अनेक व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात प्रगती साधता आल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT