New Year Celebration: जिल्ह्यातील २८ पोलिस ठाण्यांतील सुमारे एक हजार अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. नागरिक व वाहनचालकांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
रायगड जिल्हा नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अलिबाग, मांडवा, काशीद, मुरूड, श्रीवर्धन, दिवेआगार समुद्रकिनाऱ्यांसह माथेरान, महाड, खालापूर तालुक्यात पर्यटक मोठ्या संख्येने थर्टी फर्स्टसाठी दाखल झाले आहेत. या वेळी महिला सुरक्षेला प्राधान्य देत साध्या गणवेशातील अंमलदार व महिला पोलिस पथक तैनात आहे.
वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, मद्यपी चालकांना चाप बसावा, याकरिता ब्रेथ अनालायझरचा वापर केला जाणार आहे. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
वाहतूक अंमलदार ८७
ब्रेथ अनालायझर १५
नाकाबंदी पॉईंट - ३८
फिक्स पॉईंट - ११७
पेट्रोलिंग विभाग - ११२
पोलिस अधिकारी - १०९
अंमलदार - ८७४
वाहतूक - ८७
आरसीपी - २
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.