boys and girls birth rate konkan sindhudurg 
कोकण

जन्मप्रमाणाबाबत या जिल्ह्याचा आदर्श घ्यावाच

नंदकुमार आयरे

सिंधुदुर्गनगरी -   सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुला-मुलींच्या जन्म प्रमाणात समतोल राखण्यात प्रशासनाला चांगले यश येऊ लागले आहे. एप्रिल 2019 ते मार्च 2020 या एक वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात एकूण 6648 नवजात बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये मुले 3380 तर 3268 मुलींचा जन्म झाला आहे.

वर्षभरात मुलींपेक्षा 112 एवढे मुले अधिक जन्मली आहेत. 
जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत शासनाच्या विविध योजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. भ्रूणहत्या रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असतानाच मुली आणि मुलगा जन्माबाबतचा भेदभाव नष्ट करण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे. त्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांचे कामही चांगल्या प्रकारे सुरू आहे.

एक किंवा दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाणही आता वाढू लागले आहे. तसेच मुलगाच पाहिजे ही मानसिकता दूर होताना दिसत आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभही प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा जन्मदर नियंत्रणात ठेवण्यासह मुला-मुलींच्या जन्म प्रमाणात चांगल्या प्रकारे समतोल राखण्यात प्रशासनाला यश येऊ लागले आहे. 

एप्रिल 2019 ते मार्च 2020 या संपलेल्या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यात जन्मलेल्या 6648 एवढ्या नवजात बालकांमध्ये मुले 3380 व मुली 3268 जन्मल्या आहेत. जिल्ह्यातील जन्माचे प्रमाण पाहता मुलींपेक्षा वर्षभरात 112 एवढे मुलगे अधिक जन्मले आहेत. एप्रिल मे डिसेंबर 2019 आणि जानेवारी 2020 या महिन्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्म अधीर झाला आहे. 

वार्षिक जन्माचा अहवाल 

महिना        पुरुष        स्त्री 
एप्रिल 2019 -   240 -     263 
मे 2019 -   296 -   301 
जून 2019 -  286 -   256 
जुलै  2019 - 244 - 228 
ऑगस्ट 2019 - 288 - 274 
सप्टेंबर 2019 - 297 - 294 
ऑक्‍टोबर 2019 - 339 - 322 
नोव्हेंबर 2019 - 286 - 270 
डिसेंबर 2019 275 - 283 
जानेवारी 2020 - 260 - 271 
फेब्रुवारी 2020 - 271 - 232 
मार्च 2020 - 308 - 274 
एकूण - 3380 - 3268 - 6648 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निवडून आल्यानंतरही पक्षासोबतच राहू; ठाकरेंनी लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT