Nijamuddin came from Merkaj 2 people in Ratnagiri city kokan marathi news 
कोकण

ब्रेकिंग - निजामुद्दीन मरकज येथून रत्नागिरीत आले हे दोघे...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : निजामुद्दीन मरकज या मुस्लिम बांधवांच्या धार्मिक कार्यासाठी  देश विदेशातून  जवळपास १७०० लोक जमले होते. कोरोनाचा संसर्ग झालेल्या काही जणांचा त्यामध्ये समावेश होता. या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे इतरांनाही कोरोनाची लागण झाल्याची दाट शक्यता आहे. धक्कादायक म्हणजे या धार्मिक कार्यक्रमाला जिल्ह्यातील 8 ते 10 जण तर रत्नागिरी शहरातुन दोघे जण गेल्याची माहिती पुढे आली आहे.

विशेष म्हणजे या धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्यांपैकी २४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे आणि ३०० पेक्षा जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आली आहेत. अनेक लोक येथून इतर राज्यात गेल्याची माहिती मिळत आहे.

वैद्यकीय तपासणी सुरू

रत्नागिरी जिल्ह्यातून याच कार्यक्रमासाठी गेलेल्या ८ ते १० जणांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. तर रत्नागिरी शहरातून या कार्यक्रमाला दोघांनी हजेरी लावली होती.  शहरातील ते दोघे 7 तारीखला दिल्लीत निजामुद्दीन येथे पोहचले. 7 ते 10 मार्च पर्यंत हे दोघे मरकज येथे थांबले. 12 मार्चला ते दोघे दिल्लीतून अहमदनगर येथे आले. अहमदनगर येथून 13 मार्च ला हे दोघे रत्नागिरीत दाखल झाले.

अन्य ८ जणांचा समावेश​

या दोघांचा मंगळवारी शोध घेण्यात आला असून यांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. या दोघांसह इतर तालुक्यातील तहसीलदारांकडून पोलिसांच्या मदतीने या सगळ्यांचा शोध सुरु असून रत्नागिरीकरांसाठी हि गोष्ट चिंता वाढवणारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Green Plants : हिवाळ्यात घरातील व्हा राहील ताजी, या ४ हिरव्या झाडांनी हवा होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT