ठाकरे सरकारकडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचेही त्यांनी म्हटंले आहे.
रत्नागिरी - कोकणातील जनआशीर्वाद यात्रेनंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) दिल्लीसाठी रवाना झाले. गेले काही दिवस या यात्रेदरम्यान शिवसेना, (shivsena) भाजप नेत्यांनी (BJP) एकमेकांवर टीकेची झोड उठवली. दरम्यान आज पुन्हा एकदा शिवसेना नेत्याच्या मुलावर भाजपच्या निलेश राणे (nilesh rane) यांनी ट्वीटद्वारे टीका केली आहे. (konkan Update)
ते म्हणतात, शिवसेना आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav) यांचा मुलगा रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव. कोरोनामुळे हे मंदिर इतरांसाठी बंद असताना रत्नागिरीच्या जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांना मात्र मंदिरात पूजेसाठी सवलत दिली आहे. हे स्वतःसाठी मंदिर उघडून बसले आहेत. आमदार, खासदारांच्या मुलांना ठाकरे सरकारचे नियम लागू होत नाही का? असा सवालही निलेश राणे यांनी केला आहे. ठाकरे सरकारकडून प्रत्येक गोष्टीत उघड सत्तेचा दुरुपयोग सुरू असल्याचेही त्यांनी म्हटंले आहे.
दरम्यान, जनआशीर्वाद यात्रेवेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर टीका केली होती. आता पुन्हा एकदा निलेश राणे यांनी ट्वीट करुन शिवसेना आणि ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.