कोकण

तर मत्स्य कार्यालयात साप सोडणार, नीलेश राणेंचा इशारा

प्रशांत हिंदळेकर

मालवण (जि. सिंधुदुर्ग) : सागरी हद्दीत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी सुरू आहे. बंदी असतानाही एलईडीच्या साहाय्याने मासेमारी केली जाते. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर आत्महत्येची वेळ आली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाने परप्रांतीयांचे अतिक्रमण रोखण्याबरोबरच एलईडीची मासेमारी बंद न केल्यास मत्स्य कार्यालयात साप सोडण्यास मागेपुढे पाहणार नाही. आमच्यावर खुशाल कारवाई करावी, असा इशारा भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, दीपक पाटकर, बाबा परब, सभापती अजिंक्‍य पाताडे, राजू परुळेकर, बाबा मोंडकर, आनंद शिरवलकर, प्रीतेश राऊळ, महेश मांजरेकर, लीलाधर पराडकर, भाई मांजरेकर, अभय कदम आदी उपस्थित होते. 

श्री. नीलेश राणे यांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर चार दिवस साखळी उपोषण करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांची भेट घेऊन चर्चा केली. मत्स्यव्यवसायचे अधिकारी पैसे घेऊन बाहेरच्या बोटी सोडत असतील, तर मच्छीमारांनी जायचे कुठे, असा सवालही त्यांनी केला. शांतताप्रिय आंदोलनाने अधिकाऱ्यांना फरक पडणार नाही, त्यामुळे त्यांनी व्यापक लढा उभारावा, तुमच्या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा आहे.'' न्यायालयीन लढाईचा खर्चही मी करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

ते म्हणाले, "पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्‍न मला ठाऊक आहेत. याबाबत अधिकाऱ्याला समजेल, त्या भाषेत सांगणार. केंद्राची पारंपरिक मच्छीमारांना कुठेही मासेमारी करण्यास बंदी नाही, तरीदेखील खासदार नारायण राणे यांच्याशी बोलून केंद्राच्या अखत्यारीत असलेले विषय मार्गी लावू; मात्र तुम्ही अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर उत्तरांना बळी पडू नका.'' 

ते म्हणाले, 2014 मध्ये मच्छीमारांचे असलेले प्रश्‍न आजही कायम आहेत. स्थानिक आमदाराने मच्छीमार समाजाची केवळ दिशाभूल केली आहे. मी 2018 मध्ये एलईडी मासेमारीविरोधात मालवणात मोर्चा काढला होता. तेच प्रश्‍न आजही कायम आहेत. शून्य ते 12 नॉटिकल आणि 25 नॉटिकल मैलपर्यंत हद्द असून, आम्हाला मासेमारी करायला नक्की कुठे स्वातंत्र आहे, हेच आजपर्यंत पारंपरिक मच्छीमारांना समजलेले नाही. अधिकारी वर्ग फक्त त्यांची दिशाभूल करीत आहेत.'' 

अधिकारीवर्गाला फटकाविणार 
मत्स्यव्यवसायचे अधिकारी पैसे खाऊन परराज्यातील बोटी सोडून देत असतील, तर इकडच्या मच्छीमारांनी करायचे काय? पालकमंत्री, आमदार, खासदारांची मच्छीमारांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. यापुढे मीच पोलिस घेऊन समुद्रात उतरून परराज्यातील बोटी दाखवून देऊन पुराव्यांसह अधिकारी वर्गाला फटकवणार असल्याचा इशारा राणे यांनी दिला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT