या फोटोमुळे आता नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होणार का यावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूकीत शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची न्यायालयीन चौकशी सुरु आहे. दरम्यान याप्रकरणी काल राणे सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयासमोर शरण आले. यावेळी त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने सध्या त्यांची दोन दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. नितेश राणेंचे पीए राकेश राणेंच्या मोबाईलवरून हल्ल्यातील संशयीत आरोपी सातपुते याच्याशी नितेश राणेंचे मोबाईल संभाषण व राकेश परब आणि नितेश राणे यांची चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली.
दरम्यान हे सर्व सुरु असताना, काल नितेश राणे यांनी ट्वीटवर एक फोटो शेअर केला होता. यामधून त्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेला इशारा दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा (Amit Shaha) अटक झालेल्या या फोटोमुळे आता नितेश राणेंच्या अडचणीत वाढ होणार का यावर उलट-सुलट चर्चा सुरु आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी हे ट्वीट डिलीट केले आहे. पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरुनच त्यांना तशा सुचना आल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे अमित शहा यांचा फोटो ट्वीट करण त्यांना महागात पडलं का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. (konkan News)
काय होत ट्वीटमध्ये
नितेश राणे यांनी ट्विट करुन २००९ मध्ये पी. चिदंबरम गृहमंत्री असताना अमित शहा यांना अटक केल्याची घटना सांगितली होती. तर १० वर्षांनंतर अमित शहा गृहमंत्री असताना पी. चिदंबरम यांना अटक केले होते असेही सांगितले होते. त्यासोबत "समय बडा बलवान होता है, इन्सान खामो खा गुरुर करता है" असे कॅप्शन लिहित शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला होता. (Political News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.