चिपळूण (रत्नागिरी) : दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे दसपटी विभागातील अनेक गावांना फटका बसला. त्याचे पंचनामे झाले तरी आपत्ती व्यवस्थापन विभागात निधीच उपलब्ध नसल्याने शेखर निकम यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रव्यवहार करून वस्तुस्थिती मांडली. तत्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली. त्यानुसार लवकरच निधी उपलब्ध होऊन नुकसान भरपाई मिळेल, अशी आशा आमदार निकम यांनी व्यक्त केली.
आमदार निकम यांनी दसपटी विभागाचा दौरा करून पाहणी करताना मदतीचा हात दिला. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. बाधित लोकांना मदत मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार निकम यांनी पाहणीदरम्यान सांगितले.अवकाळी पडलेल्या गारपीट व वादळी वार्याचा फटका अनेक गावांना बसला. काही घरांचे छप्पर उडून गेले तर काहींची कौले, पत्रे फुटल्यामुळे बेघर व्हावे लागलेल्या लोकांसाठी आमदार शेखर निकम यांनी तत्काळ मदतीचा हात पुढे केला.
नुकसानग्रस्तांसाठी अजित पवारांना साकडे
धनगरवाडीत काही घरांवरील कौले फुटली, त्यांना कौले तर काहींना पत्रे उपलब्ध करून दिले. आज निकमांच्या सह्यादी शिक्षण संस्थेचेपण नुकसान झाले असतानाही त्याकडे लक्ष न देता गोविंदराव निकम यांच्याप्रमाणेच आज अनेकांना मदतीचा हात पुढे केला. त्याचबरोबर दसपटी भागातील रिकटोली, आकले, तिवरे, शिरगाव, पोफळी सय्यदवाडी आदी गावांचा दौरा करून पाहणी केली. त्या वेळी तेथील सरपंच व तलाठी यांच्याकडून पंचनामे व्यवस्थित झाले आहेत की नाहीत याचीही माहिती घेतली.
दसपटी विभागाची पाहणी
वादळी वारा व गारपीटच्या पावसाने सार्यांना झोडपले तर शिरगाव येथील धनगरवाडीतील अनेक घरांचे छप्पर उडून गेले. त्यामुळे अनेकजण बेघर झाले याची माहिती पंचायत समिती सदस्य बाबू साळवी यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि धनगर बांधवांना कौले उपलब्ध करून दिली. घरासाठी कौले देऊन त्यांना मायेची एकप्रकारे पांघरूण घातली. त्यामुळे शिरगाव येथील धनगर बांधवांनी बाबू साळवी यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.