office will be set up for disabled MLA Bharatshet Gogawale development works raigad sakal
कोकण

Raigad News : दिव्यांगांसाठी अद्ययावत कार्यालय उभारणार; आमदार भरत गोगावले यांची ग्‍वाही

महाड तालुक्यात दिव्यांगांची संख्या मोठी असून त्यांना विविध कामांसाठी शहरात यावे लागते.

सकाळ वृत्तसेवा

Mahad News: महाड तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शहरांमध्ये अद्ययावत कार्यालय उभे करून दिले जाईल, अशी ग्वाही महाडचे आमदार भरत गोगावले यांनी जागतिक दिव्यांग दिन सप्ताह निमित्त आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात दिली.

श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने ढालकाठी येथे नुकताच मेळावा घेण्यात आला. यात दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष साईनाथ पवार, नायब तहसीलदार भाऊसाहेब भाबड, महाड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भास्कर जगताप, महाड आगाराचे वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव, श्री समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या अध्यक्ष दीप्ती शेडगे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महाड तालुक्यात दिव्यांगांची संख्या मोठी असून त्यांना विविध कामांसाठी शहरात यावे लागते. दिव्यांगांना मदत करणे, त्यांना आधार देणे, हे आपले प्रथम कर्तव्य असल्‍याचे गोगावले यांनी सांगितले. साईनाथ पवार यांनी दिव्यांग सहायता दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली.

दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. त्‍या जनसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्‍याबाबत जनजागृतीसाठी मेळावा आयोजित केल्‍याचे पवार यांनी सांगितले. संस्थेचे रायगड जिल्हा सल्लागार सुरेश पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष शैलेश बावळेकर, रायगड जिल्हा सचिव अनिल जाधव, रायगड जिल्हा खजिनदार मुबीन देशमुख आदींनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतले.

रस्‍त्‍यांसाठी पाच कोटींची तरतूद

पोलादपूर तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत आड-निवे, ताम्हाणे, किनेश्वर ते रामपार घाटा या रस्‍त्‍यासाठी साडेपाच कोटींच्या तरतूद केली आहे. या कामाचे भूमिपूजनही भरत गोगावले यांच्या हस्‍ते नुकतेच करण्यात आले.

‘पाणसई-करंजेवाडीतील विकासासाठी कटिबद्ध’

माणगाव गावागावांत केलेल्‍या विकासकामांमुळे तीन वेळा निवडून आलो आहे. काही रुपयांसाठी स्‍वाभिमान विकू नका, पाणसईमध्ये केलेली ८० टक्‍के कामे शिवसेनेने केली आहेत, असे प्रतिपादन आमदार भरत गोगावले यांनी केले. पाणसई-करंजेवाडीतील श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, स्वराज्य मित्र मंडळ, महिला मंडळ व मुंबईकर मंडळ यांनी नुकताच गोगावले यांच्या उपस्‍थितीत शिंदे गटात प्रवेश केला. कार्यक्रमास दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, विपुल उभारे, ॲड. महेंद्र मानकर आदी उपस्‍थित होते.

दिव्यांग बांधवांनी आपल्याकडील आवश्यक आणि योग्य कागदपत्रे सादर करून तपासणी करावी. त्‍यामुळे त्‍यांचा वेळ व कष्‍ट वाचतील आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येणार नाहीत.

- भास्‍कर जगताप, वैद्यकीय अधिकारी, महाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT