Bahadur Shaikh Naka Flyover Girder Collapse esakal
कोकण

Mumbai-Goa Highway : उड्डाणपुलाचे गर्डर हटवताना महामार्गाची एक लेन बंद होणार? प्रशासन महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

उड्डाणपूल कोसळल्यानंतर तब्बल पावणेदोन महिन्यानंतर ते हटवण्याची कार्यवाही सुरू होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

तज्ज्ञांच्या पाहणीनंतरच प्रशासन याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Goa National Highway) बहादूरशेख नाका (Bahadur Shaikh Naka) येथील कोसळलेल्या उड्डाणपुलाचे (Flyover) गर्डर, लाँचरसह अन्य साहित्य हटवण्यासाठी शुक्रवार सायंकाळपर्यंत या एजन्सीचे तज्ज्ञ येथे दाखल होत आहेत. काही यंत्रणाही चिपळूणच्या मार्गावर आहेत.

येथे आल्यानंतर त्यांचा सेटअप् पूर्ण झाल्यानंतर गर्डर आणि लाँचर हटवण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. काम करताना शक्यतो महामार्गाची एक लेन बंद ठेवावी लागण्याची शक्यता आहे; मात्र तज्ज्ञांच्या पाहणीनंतरच प्रशासन त्याबाबतचा निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोसळलेले गर्डर हटवण्याबाबत नियुक्त केलेल्या नागपूर येथील माते अ‍ॅण्ड असोसिएटस् या तज्ज्ञ एजन्सीची टीम येथे दाखल झाली आहे. त्यामुळे उड्डाणपूल कोसळल्यानंतर तब्बल पावणेदोन महिन्यानंतर ते हटवण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. पेढे-परशुराम ते खेरशेत या चिपळूण टप्प्यातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्ण गेल्यानंतर उड्डाणपूल कामाला गती देण्यात आली; मात्र काम सुरू असताना १६ ऑक्टोबरला उड्डाणपुलाचा काही भाग लाँचरसह कोसळला.

त्यानंतर या उड्डाणपुलासदंर्भात शासनाने तज्ज्ञ समिती नियुक्त केली. या तज्ज्ञ समितीने अहवाल दिल्यानंतर काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्राथमिक बैठक झाली होती. कोसळलेल्या उड्डाणपुलाचे गर्डर आणि लाँचर काढण्याचे काम अडचणीचे असल्याने अशी कामे केलेल्या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचे ठरले होते. त्यानुसार नागपूर येथील माते अ‍ॅण्ड असोसिएटस् या तज्ज्ञ एजन्सीची मदत घेण्याचा निर्णय झाला. त्यास राष्ट्रीय महामार्ग विभागाने मान्यता दिली.

आणखी एक लाँचर आणला

काम करताना एकाचवेळी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने गर्डर बसवण्याचे काम करता येते. यासाठी महामार्ग कंत्राटदार ईगल कंपनीने आणखी एक लाँचरदेखील आणला आहे; परंतु लटकणारे गर्डर जमिनीवर उतरवणे व त्यातील केबल सोडवणे हे अत्यंत कठीण व जिकिरीचे काम असल्याने त्यासाठी तज्ज्ञ एजन्सीचा सल्ला आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या कामाला मान्यता मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून या एजन्सीमधील तज्ज्ञ येण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT