राजापूर(रत्नागिरी): जिल्ह्यातील सर्वाधिक सातबारा संख्या असणारा तालुका असूनही राजापूर तालुक्याने सातबारा उतारा संगणकी करण्याचे काम पूर्ण करण्यामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे शेतकर्यांसह तालुकावासियांना आता ऑनलाईन पध्दतीने डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा कुठेही उपलब्ध होणार आहेत. अपुरा कर्मचारी वर्ग असनाही प्रांताधिकारी प्रविण खाडे आणि तहसिलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील महसूल विभागाने नव्या वर्षाच्या शुभारंभाला साधलेल्या सुखद कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
जमिनीचा मालकी हक्क दर्शविणारा पुरावा म्हणून सातबारा उतार्याला महत्व आहे. त्यातच, विविध शासकीय कामांसाठी जमीनीची सातबारा आणि फेरफार शेतकर्यांना आवश्यक असतात. मात्र, अनेकवेळा तलाठ्यांशी न होणारा संपर्क, वारंवार डाऊन असलेला सर्व्हर आदी विविध कारणांमुळे सातबारा उतार्यासाठी शेतकर्यांना तलाठी कार्यालयामध्ये वारंवार खेटे मारावे लागतात. लोकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन शासनाने 2013 पासून महसूल व वन विभाग अधिकारी अभिलेखातील नोंदी व त्यांच्या कार्यपध्दतीचे संगणकीकरण ई फेरफार कार्यकम संपूर्ण राज्यात हाती घेतला आहे. त्यानुसार शेतकर्यांच्या जमिनीचे सातबारा ऑनलाईन करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतरही अनेक ऑनलाईन सातबारामध्ये अनेक त्रुटी राहिल्याने जमीन मालकांना असे चुकीचे सातबारे अडचणीचे ठरू लागले. त्यामुळे सातबारा ऑनलाईन प्रक्रीयेत झालेल्या चुका सुधारण्यासाठी पुन्हा नव्याने सातबारा ऑनलाईनचे काम हाती घेण्यात आले.
237 महसूली गावे आणि त्यामध्ये 12 मंडल आणि 69 सजांचा समावेश असलेल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यातील सर्वाधिक खातेदार आहेत. मात्र, त्या तुलनेमध्ये कर्मचारी अपुरे असल्याने सातबारा ऑनलाईनचे काम करताना महसूल प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. त्यामध्ये 3 लाख 18 हजार 949 सातबारा उतार्यांचे शंभर टक्के ऑनलाईनचे काम पूर्ण झाल्याची माहिती तहसिलदार श्रीमती वराळे यांनी दिली.
मंडल अधिकार्यांसह तलाठ्यांच्या मोठ्यासंख्येने रिक्त जागा, वारंवार खंडीत होणारे इंटरनेट कनेक्शन अशा अडथळे पार करीत सातबारा ऑनलाईन संगणकी करणाचे शंभर टक्के काम पूर्ण केल्याबद्दल महसूल विभागाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे. यासाठी प्रांताधिकारी प्रविण खाडे, तहसिलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल अधिकारी, तलाठी आदींसह त्यांना सहाय्य करणारे नायब तहसिलदार ए.जी. शेळके, के. एम. दाभोळकर. डीबीए सहाय्यक ए.पी. ढोले आदींनी सातबारा उतारा ऑनलाईन करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ऑनलाईन सातबारा उतारा ऑनलाईन झाल्याने शेतकर्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
दृष्टीक्षेपात राजापूरचे सातबारा उतारे
एकूण सातबारा उतारे ः 318949
सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे मंडल ः नाटे (49216)
सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे सजा ः राऊतवाडी (17623)
सर्वात जास्त सातबारा संख्या असणारे महसूल गाव ः राऊतवाडी ः (7746)
डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले गाव ः जांभारी (64)
डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले सजा ः सागवे (4408)
डीएसडीचे काम प्रथम पूर्ण झालेले मंडल ः कुंभवडे (28810)
संपादन- अर्चना बनगे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.