opposition from villagers Solgaon-Barsu refinery project Nilesh rane protest Uday samant ratnagiri sakal
कोकण

रत्नागिरी : बारसू रिफायनरीला विरोध कायम

रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झालेल्या लोकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी आलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा पाऊण तास रोखून धरला.

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सोलगाव-बारसू परिसरामध्ये प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीच्या अनुषंगाने माती परीक्षण आणि अन्य सर्वेक्षणाचे काम पुन्हा एकदा सुरू झाले आहे. त्याला प्रकल्पविरोधी ग्रामस्थांकडून तीव्र विरोध केला जात आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आक्रमक झालेल्या लोकांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी आलेले भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा पाऊण तास रोखून धरला. रिफायनरीसाठीचे माती परीक्षण आणि सर्वेक्षण जून महिन्यामध्ये ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून रोखले होते. आज पुन्हा नव्याने सर्वेक्षणाच्या कामाला सुरवात झाली.

लोकांचा विरोध लक्षात घेऊन बारसू परिसरामध्ये जादा पोलिस कुमकही तैनात केली होती. आज सकाळी माजी खासदार नीलेश राणे यांनी बारसू येथील सर्वेक्षणाच्या ठिकाणाला भेट दिली. तेथून राजापूरकडे परतत असताना प्रकल्पविरोधी ग्रामस्थ आणि महिलांनी रस्त्यामध्ये ठिय्या मांडत राणे यांच्यासह त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. ‘रिफायनरी रद्द झालीच पाहिजे’ अशा जोरदार घोषणा ग्रामस्थांनी दिल्या. नीलेश राणे यांनी ग्रामस्थांबरोबर आणि रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांच्याशी संवाद साधत याप्रकरणी चर्चेची तयारी दाखविली. त्यानंतर त्यांच्या ताफ्याला मोकळी वाट करून देण्यात आली.

रिफायनरीबाबत काही स्वयंसेवी संस्था स्थानिक नागरिकांत गैरसमज पसरवत आहेत. नागरिकांसोबत चर्चा करून या प्रकल्पाचे महत्त्व त्यांना सांगणार आहोत. या प्रकरणात स्थानिकांवर कारवाई न करण्याबाबत पोलिसांसोबत चर्चाही केली आहे.

- उदय सामंत, उद्योग मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT