school sakal
कोकण

राजापूर : पाचल-बौद्धवाडीत मुले रमली दप्तरमुक्त शाळेत

राजापूर तालुक्यातील पहिलीच शाळा; प्रगतीसह पटसंख्या उत्तम, आनंददायी शिक्षणाचा हेतू साध्य

राजेंद्र बाईत - सकाळ वृत्तसेवा

राजापूर : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाचल बौद्धवाडी या सेमी इंग्रजी शाळेने ''दप्तरमुक्त शाळा'' आणि विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ''आनंदमयी शिक्षण'' हा नवोपक्रम सुरू केला आहे. दप्तरमुक्तीचा उपक्रम राबवणारी पाचल-बौद्धवाडी ही राजापूर तालुक्यातील पहिली शाळा ठरली आहे.

विद्यार्थी पाठ्यपुस्तके शाळेमध्ये ठेवतात. दिवसभर शाळेमध्येच विद्यार्थी अभ्यास करतात. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि त्यांना दैनंदिन होमवर्क देण्यासाठी अन् त्याच्या नोंदी ठेवण्यासाठी, दिवसभरातील प्रशालेतील अभ्यासासाठी एक तर, शाळेतून घरी गेल्यानंतर करावयाच्या अभ्यासाची एक अशी दोन वर्कबुक असतात. घरी करावयाच्या अभ्यासाचे एक वर्कबुक घेऊन विद्यार्थी घरी जातो आणि तेच घेऊन शाळेत आणतो. लॉकरमध्ये अभ्यासाची पुस्तके, शैक्षणिक साहित्य ठेवले जाते.

गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, विस्तार अधिकारी विनोद सावंग, केंद्रप्रमुख सीताराम कोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक नितीन पांचाळ आणि उपशिक्षक जयराज पांगरीकर या द्वयींनी लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने काही वर्षापूर्वी लुंबिनी बुद्धविहारामध्ये सुरू झालेल्या या वस्तीशाळेचे एका ''आदर्शवत जिल्हा परिषद शाळेमध्ये रूपांतर केले आहे. पालकही या शाळेमध्ये आपल्या पाल्याला दाखल करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे पटसंख्या ७५ वर गेली आहे.

असा केला जातो अभ्यास...

दैनंदिन अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकांसह संगणक, टॅब, प्रोजेक्टर, स्वनिर्मिती व्हिडीओ आदी साहित्यांचा वापर करण्यात येतो. नियमित अभ्यासाचे नियोजन करताना भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास यांच्या स्वाध्यायासोबत चित्रवर्णन, प्रवासवर्णन, परिसर निरीक्षण, स्वानुभव कथन, चित्र रेखाटन, बातमीवाचन, वर्तमानपत्र वाचन, प्रश्‍न तयार करणे, परिसरातील वस्तूंचे व निसर्गबदलांचे निरीक्षण असे स्वाध्याय आहेत. अशी माहिती नितीन पांचाळ यांनी दिली.

सहकारी शिक्षक जयराज पांगरीकर यांच्या सहकार्याने आनंदमयी शिक्षण देताना दप्तरमुक्त शाळा हा उपक्रम राबवत आहोत. केवळ पुस्तकी ज्ञान न देता, त्याचा व्यवहारामध्ये कसा उपयोग होईल, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होईल, यावर भर देण्यात आला आहे.

-नितीन पांचाळ, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

IND vs AUS : Yashasvi Jaiswal च्या दीडशतकी खेळीने रचला नवा विक्रम ; दिग्गजांमध्ये स्थान मिळवणारा पहिला भारतीय

Adampur Firing : भरदिवसा दोन टोळ्यांमध्ये गोळीबारचा थरार; एकमेकांवर झाडल्या गोळ्या, आदमापुरात नेमकं काय घडलं?

Girish Mahajan : गिरीश महाजन ठरले पुन्हा संकट मोचक; बंडखोरी थोपविण्यात यश

Nashik East Assembly Constituency : बालेकिल्ला शाबूत, ढिकलेच ‘पहिलवान’

SCROLL FOR NEXT