Car Accident sakal
कोकण

Pali Accident : पाली खोपोली राज्य महामार्गावर विचित्र अपघात! कारचे तोंड आकाशाकडे, पाच तरुण थोडक्यात बचावले

पालीहून कार्ला येथे आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना, शेमडी गावाजवळ ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळून अपघात झाला.

अमित गवळे

पाली - पाली खोपोली राज्य महामार्गावर रविवारी (ता. 13) सायंकाळी कारचा विचित्र अपघात झाला. पालीहून कार्ला येथे आई एकविरेच्या दर्शनासाठी जात असताना, शेमडी गावाजवळ ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला जाऊन झाडावर आदळून अपघात झाला. झाडाला आदळून ही कार रस्त्याच्या बाजूला आकाशाकडे तोंड करून उभी होती. कार मधील पाच तरुण थोडक्यात बचावले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, येथे वळणावर कार नियंत्रणाबाहेर जाऊन थेट रस्त्याच्या बाजूच्या झाडावर आदळून उलटली, ज्यामुळे गाडीच्या पुढील भागाचे दृश्य खिळवून ठेवणारे होते. कारची पुढील बाजू व चाके आकाशाकडे उंचावलेली होती.

कारमध्ये प्रवास करणारे पाच तरुण अक्षरशः मृत्यूच्या दारातून परतले. सुदैवाने, कोणालाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अपघातानंतर, प्रवासी आणि स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. सायंकाळी उशिरापर्यंत कार बाहेर काढण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT