Anant Davate sakal
कोकण

Pali News : मरावे परी अवयवरूपी उरावे; अनंत दवटे यांचे मरणोत्तर नेत्रदान

पारंपरिक चालीरीतींना फाटा देत दशक्रिया व उत्तरकार्य न करता रक्कम दिली अनाथाश्रमाला

अमित गवळे

पाली - मरावे परी अवयवरूपी उरावे, या उक्तीला साजेसे काम केले आहे, श्रीवर्धन येथील अनंत दवटे यांनी, त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. त्याचबरोबर मरणोत्तर पारंपरिक चालीरीती व कर्मकांड करण्यात आले नाही. शिवाय दशक्रिया व उत्तरकार्य न करता ही वाचलेली रक्कम अनाथाश्रमाला दान करण्यात आली.

श्रीवर्धन मधील भैरवनाथ पाखाडीतील रहिवासी अनंत दवटे यांनी मरणोत्तर नेत्रदान करून अधांना दृष्टी दिली आहे. अनंत दवटे यांचे वयाच्या 75 व्या वर्षी ठाणे येथे बुधवारी (ता.15) प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

दवटे ठाण्यामध्ये पुरवठा विभागात शिधावाटप अधिकारी म्हणून कार्यरत असलेले अनंत दवटे सन 2004 साली निवृत्त झाले. आपल्या आजारपणाच्या काही वर्ष आधी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांनी केला होता. यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील केली होती. मरणोत्तर कोणत्याही दशक्रिया किंवा बाराव्याचा विधी न करता वाचलेली रक्कम अनाथ आश्रमाला दान करण्याची सूचना त्यांनी आपल्या मुलांना दिली होती.

मरणोत्तर तिसऱ्या दिवशी तीर्थक्षेत्र हरेश्वर येथे अस्ती विसर्जन करून सुतकातून मुक्त होऊन दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करण्यास आपल्या कुटुंबियांना सांगितले होते. त्याचबरोबर पत्नीच्या आधी मृत्यू आल्यास तिचे सौभाग्य लेणे न उतरवता तिला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी ही इच्छा व्यक्त केली होती. हे केवळ तोंडी सूचना न देता लिखित इच्छापत्र वयाच्या 75 वर्षी जवळच्या गणगोतासमोर त्यांनी वाचून दाखवलं होते.

त्यांच्या या पुरोगामी संकल्पनांना कृतिशील रूप देत कुटुंबीय त्यांचे नेत्रदान करण्याची हिम्मत दाखवली, तसेच मुलाबरोबर मुलीनेही वडिलांना खांदा देत अग्निसंस्कार केले. वडिलांच्या पुरोगामी विचारांची बांधिलकी जपणारे दवटे कुटुंबीय सर्व समाजासाठी अनुकरणीय ठरले आहेत. यावेळी त्यांची पत्नी अजिता, मुलगा अनिकेत, सून अक्षता नातवंडे ऋजुला, जेसिका, साईश यांनी धिराने या प्रसंगाला तोंड दिले.

त्यांच्या या प्रबोधनात्मक व पुरोगामी विचारांना मुली अपर्णा व आरती, जावई, समस्त दवटे परिवार आणि मामाकडील पडवळ कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा लाभला. अनंत दवटे यांचा संकल्प त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

नेत्रदानाचा निर्णय कठोर असला तरी ती एक सामाजिक बांधिलकी आहे. याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा. कर्मकांडावर होणारा खर्च विधायक कामांसाठी द्यावा.

- आरती नाईक, मुलगी व अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यवाह आरती नाईक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT