कोकण

कौतुकच! तिसऱ्या दिवशीच जिंकली लढाई; अन् हरवले कोरोनाला

- सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : लक्षणे जाणवताच क्षणाचाही विलंब न लावता, केलेली चाचणी, शिक्षक (Teacher)मित्रांनी दिलेला धीर, डॉक्टरांचे (Docter)योग्य उपचार आणि मनाची सकारात्मक मानसिकता यामुळे महाभयंकर वाटणाऱ्या कोरोनावर (Covid 19) मात केल्याचे मंडणगडचे (Mandangad) प्राथमिक शिक्षक आनंद पांडुरंग सुतार (Aanand Sutar) यांनी सकाळशी बोलताना आपला अनुभव सांगितला. योग्य आहार, नियमित औषधे, गरम पाणी, वाफ, व्यायाम आणि चांगली मानसिकता यामुळे कोरोनावर १०० टक्के मात करता येते असे ते म्हणाले.

performed teacher symptoms appear And defeated Corona kokan marathi news

आनंद सुतार हे तिडे निमदेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांना दोन दिवस अंगात तापाची कणकण जाणवत होती. खोकला अजिबात नव्हता. मात्र चव व वास जाणवत नव्हता. दुसऱ्या दिवशी हेल्थ केअर हॉस्पिटलमध्ये डॉ. कुणाल मेहता यांचा सल्ला त्यांनी घेतला. डॉक्टरांनी वास व चव न येणे ही कोरोनाची लक्षणे आहेत.त्यांनी अँटीजेन चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. क्षणाचाही विचार न करता सुनेला घेऊन समाज कल्याण वसतिगृह येथील कोविड केंद्र मंडणगड येथे अँटीजेन चाचणी केली. अनपेक्षितपणे रिपोर्ट हा पॉजिटीव्ह आला.याचा अंदाज त्यांनी सोबत असणाऱ्या सुनेच्या चेऱ्यावरून बांधला.

कुटुंबाची जबाबदारी ओळखून वसतिगृहातील विलगीकरण कक्षेत राहण्याचा निर्णय केला. आपला कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याचे त्यांनी सहकारी शिक्षक मित्र संजय कदम, संतोष करावडे, दिलीप मराठे, अरुण गणवे, अशोक सुर्वे, नरेंद्र सकपाळ, निलेश लोखंडे, सुनील आईनकर, साधना साळुंखे व निमदेवाडी ग्रामस्थ व सर्व मित्रांना कळविले. त्यानंतर सर्वांनी त्यांना खूपच धीर दिल्याचे ते म्हणाले. कुटुंबात पत्नी, मुलगे, सुना, नातवंडे असल्याने त्यांची मानसिकता खचली होती. तरीही कुटुंबियांना माझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेअंतर्गत चाचणी करण्यास सांगितले. त्यांच्या संपर्कात जास्त न आल्याने त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले.सहकारी, मित्रांचे आधार व कुटुंबातील सर्वांचे निगेटिव्ह रिपोर्ट यामुळे इथेच ५० टक्के कोरोना मुक्त झाल्याचे ते म्हणाले.

विलगिकरण केंद्रात सकस आहार आणि उपचार

विलगिकरण केंद्रात आंघोळ व पिण्यासाठी गरम पाणी, चहा, नाष्टा, दुपार व संध्याकाळी जेवणात अंडी, संध्याकाळी हळद मिश्रित दूध असा सकस आहार मिळत होता. तसेच डॉक्टर, कर्मचारी सारखे विचारपूस करत होते. ही सर्व मंडळी खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे असल्याचे सांगत त्यांना सलाम केला.

डॉक्टर, मित्रांच्या सल्ल्याने दैनंदिन दिनक्रम

या दिवसांत गरम वाफारा घेणे अत्यावश्यक असल्याने मित्रांच्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर त्याबाबत पोस्ट टाकली. सहकारी शिक्षक मित्र सुनील आईनकर यांनी त्वरित वाफ घेण्याची मशीन उपलब्ध करून दिली. या दरम्यान भेटलेले प्रल्हाद कोकणी यांनी मार्गदर्शन करून 90 टक्के भीती घालवली. दरदिवशी पहाटे उठणे, व्यायाम करणे, अंघोळ करणे, वारकरी असल्याने हरिपाठ, अभंग, कीर्तन ऐकणे, ज्ञानेश्वरी वाचन हा सकाळ संध्याकाळ दिनक्रम होता. दर दोन दिवसांनी डॉ. प्रभाकर भावठाणकर, श्री व सौ. डॉ. नागपुरे यांची भेट असायची. तिसऱ्या दिवशीच मला वास व चवीची जाणीव झाली.

अनुभवातून हात जोडून सांगतो की, मी आता पूर्ण बरा झालो असून तुम्हाला लक्षणे जाणवली तर लगेच कोरोना चाचणी करून घ्या. घाबरू नका, मास्क वापरा, भरपूर जेवा, सॅनिटायजरचा वापर करा, नियमित व्यायाम करा, दिवसातील 2 वेळा गरम वाफ घ्या, नियमित औषधे घ्या. असे न घाबरता केले तर तुम्ही 5 किंवा 6 दिवसांनी नक्की बरे व्हाल.

आनंद सुतार, प्राथमिक शिक्षक

performed teacher symptoms appear And defeated Corona kokan marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT